For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खो-खो मैदान नांगरले, क्रिकेट टर्फ बंदिस्त

03:10 PM Jun 07, 2025 IST | Radhika Patil
खो खो मैदान नांगरले  क्रिकेट टर्फ बंदिस्त
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

शिवाजी विद्यापीठामधील खो-खो मैदानावर नांगर फिरवण्यात आला आहे. तर क्रिकेटचे टर्फ लोखंडी जाळी मारुन बंदिस्त करण्यात आले आहे. अशा प्रकारातून येथे सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना एकप्रकारे मज्जाव करण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडून सुरु असल्याची टीका खेळाडू, पालकांमधून होत आहे. विद्यापीठाने मैदाने बंदिस्त न करता ती सर्वांसाठी खुली करावीत, अशी मागणी खेळाडू, पालकांमधून होत आहे.

शिवाजी विद्यापीठमध्ये खो-खो, क्रिकेट टर्फ, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशी क्रीडा मैदाने आहेत. येथील मैदानांवर आर्मी, एनसीसी विद्यार्थ्यांसह फुटबॉल व क्रिकेटच्या सरावासाठी बाहेरील खेळाडू येतात. या मैदानांवर खेळाडूंकडून नियमित पण सराव सुरु होता. पण आठवड्याभरापूर्वी येथील खो-खो मैदानावर नांगर फिरवला गेला. त्यामुळे या मैदानावर फुटबॉलची प्रॅक्टीस फुटबॉल खेळाडूंना करता येत नाही आहे. तर येथील खुले असणारे क्रिकेटचे टर्फ देखील महिनाभरापुर्वी बंदिस्त करण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेटच्या सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना आता दुसऱ्या मैदानाचा शोध घ्यावा लागत आहे.

Advertisement

  • क्रिकेट टर्फची दूरावस्था

येथील क्रिकेट टर्फ महिनाभरापुर्वी बंदिस्त करण्यात आले. येथे काही क्रिकेटपटूंचा नियमित सराव सुरु होता. मात्र लोखंडी जाळी मारुन हे टर्फ बंदिस्त केले असल्याने ते पडून आहे. यामुळे मैदानामध्ये गुडघाभर गवत वाढले असून टर्फची दूरावस्था झाली आहे.

  • स्वच्छतागृह अस्वच्छ

येथे असणारी स्वच्छतागृहांचे नियमित स्वच्छता होत नाही. त्यामुळे येथील बहुतांश स्वच्छतागृह ही अस्वच्छ आहेत. त्यामुळे या स्वच्छतागृहांचा खेळाडू वापर करत नाहीत. विशेषत: महिला खेळाडूंची यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसुविधा होत आहे. स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

  • विद्यापीठ स्पर्धेदरम्यानच वापर

येथील बहुतांश क्रीडा मैदान वापराविना पडून आहेत. विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा दरम्यानच महिनाभर या मैदानांचा वापर होतो. इतरवेळी या मैदानांवर खेळाडूच नसतात. त्यामुळे या मैदानांचा वापर काही स्थानिक खेळाडूंकडून विविध खेळांसाठी केला जातो. मात्र सध्या यापैकी काही मैदाने बंदिस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याने खेळाडूंमधून नाराजी व्यक्त होत आहे.

  • लेव्हल करण्यासाठी मैदाने नांगरली

शिवाजी विद्यापीठांतर्गत असलेली मैदाने लेव्हल करण्यासाठी आणि लॉन लावण्यासाठी नांगरली आहेत. यामध्ये टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, क्रिकेट, अॅथलेटिक्स मैदानांसह अन्य मैदानांचा समावेश आहे. तसेच काही मैदानांवर त्या मैदानाच्या खेळाचा सराव करण्याऐवजी अन्य खेळाचा सराव केला जात आहे. तरी खेळाडूंनी ज्या-त्या मैदानाचा वापर ज्या-त्या खेळाच्या सरावासाठी करावा.

                                                               - डॉ. शरद बनसोडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, शिवाजी विद्यापीठ

Advertisement
Tags :

.