For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केळशी-मांदिवलीच्या तलाठ्याला लाच घेताना पकडले

12:31 PM Jun 11, 2025 IST | Radhika Patil
केळशी मांदिवलीच्या तलाठ्याला लाच घेताना पकडले
Advertisement

दापोली :

Advertisement

तालुक्यातील केळशी व मांदिवली सजेचा अतिरिक्त कार्यभार असलेले ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी राजेंद्र उंडे यांना 20 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी 2.30 वाजता ताब्यात घेतले. मंडणगडात मागील महिन्यातील महसूलच्या तलाठी व अन्य अधिकाऱ्यांवरील कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच दापोलीतील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्यासाठी तलाठी राजेद्र उंडे (सजा केळशी अतिरिक्त पदभार मांदिवली) यांनी तक्रारदारांकडे 5 जून रोजी 20 हजार ऊपयांची मागणी केली होती. ही रक्कम 10 जून रोजी स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानुसार मागणी केलेली रक्कम 20 हजार ऊपये ग्राम महसूल अधिकारी उंडे यांनी 10 जून रोजी पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर राजेंद्र उंडे यांना दुपारी 2.30 वाजता पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. या बाबत गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Advertisement

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, सुहास शिंदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे रत्नागिरी पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहाय्यक फौजदार चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल संजय वाघाटे, विशाल नलावडे, श्रेया विचारे, दीपक आंबेकर, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर, पोलीस नाईक प्रशांत कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली.

  • नागरिकांना आवाहन

ज्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसमाने (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य रकमेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.