महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘एसटी’चा प्रवास आता ‘कॅशलेस’! युपीआयद्वारे तिकिटांचे पैसे देता येणार

12:45 PM Dec 14, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

बाळासाहेब उबाळे कोल्हापूर

कोणतेही व्यवहार करताना सध्या ते रोख न करता कॅशलेस केले जात आहेत. मोबाईलवरुन कितीही मोठे आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे रोकड जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. त्यातूनच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या प्रवासात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत तिकिटासाठी रोख रक्कम द्यावी लागत होती. 7 डिसेंबरपासून महामंडळांने प्रवासाच्या तिकिटाचे पैसे युपीआयद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता एसटीचा प्रवासही कॅशलेस झाला आहे.

Advertisement

मोबाईल आणि ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नव्हती तोपर्यंत बाजारात सुट्या पैशांचा मोठा प्रश्न होता. सुट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये सतत वाद होत होते. हा वाद टाळण्यासाठी एसटीमध्ये कृपया सुटे पैसे देऊन प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केलेले वाक्य होते. तरीही सुट्या पैशांमुळे वाद होत होते. महामंडळाने एसटीच्या प्रवासात युपीआयद्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सुविधा देत सुट्या पैशांचा प्रश्नच निकालात काढला आहे.

Advertisement

एसटी महामंडळाच्या सर्व आगारात नवीन अँड्रॉईड ईटीआय मशीन कार्यान्वित केली आहेत. याद्वारे एसटीतही रोकड विरहित सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये युपीआय क्यूआर कोडद्वारे पैसे घेण्याची कार्यपध्दती सुरु केली आहे. दुसऱ्या टप्प्यात डेबीट व क्रेडिट कार्डवर व्यवहाराची सुविधा उपलब्ध हेणार आहे. कोल्हापूर विभागात एसटीतून कॅशलेस प्रवास सुरु झाला असून त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त तिकिटे युपीआयद्वारे पेमेंट करुन घेतली जात आहेत.

प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल
परिवहन महामंडळांने प्रवाशासाठी युपीआयद्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. गेल्या आठवड्यात ही सुविधा सुरु झाली आहे. त्यामुळे प्रवाशापर्यंत ही माहिती पोहोचण्यास काही दिवस लागतील. कोल्हापूर-पुणे मार्गावर मात्र ऑनलाईन व्यवहाराला प्रतिसाद मिळत आहे. तिकिटाचे पैसे थेट एसटीच्या खात्यात जमा होत असल्याने वाहकांची जबाबदारी कमी झाली आहे.
अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, कोल्हापूर

व्यवहार न झाल्यास येथे संपर्क साधा
एसटीतून प्रवास करताना ऑनलाईन व्यवहार न झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे 400 व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे 8800688006 यावर संपर्क करावा.

महामंडळाची दुसरी कॅशलेस सुविधा
राज्य परिवहन महामंडळाची आवडेल तिथे प्रवास योजना आहे. या योजनेलाही प्रवाशांचा प्रतिसाद आहे. यासाठी प्रवासापूर्वी तिकिटाचे पैसे भरावे लागतात. त्यामुळे प्रवास करताना तिकिटाचे पैसे बरोबर घेण्याची गरज नाही. त्यानंतर आता युपीआयद्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सुविधा उपलब्ध केल्याने एसटीची दुसरी कॅशलेस सुविधा सुरु झाली आहे.

Advertisement
Tags :
'ST' is now 'CashlessTarun Bahrat News
Next Article