महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चौकूळ गावच्या जमीन वाटपाचा प्रश्न अखेर निकाली ; ग्रामस्थांत आनंद

05:38 PM Sep 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

चौकूळ कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत 65 व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. यासमितीत जमीन वाटपाचे अधिकार शासनाच्या अध्यादेशानुसार देण्यात आले आहेत. या समितीला पॉवर ऑफ ॲटर्नी देण्यात आली आहे. गाव समितीमार्फत गाव पातळीवर करण्यात आलेल्या शिफारसी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक संचालक ,नगररचना हे पुढील कार्यवाही करणार आहेत. हा अध्यादेश 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे अपर सचिव विनायक लवटे यांनी काढला आहे. त्यामुळे आता चौकूळ गावच्या जमीन वाटपाचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. हा काढण्यात आलेला अध्यादेश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज गाव समितीसमोर जिल्हाधिकारी यांच्याकडे हा समितीला सर्वाधिकार देण्यात आल्याचा अध्यादेश जारी केला. यावेळी श्री केसरकर म्हणाले, चौकुळ आंबोली ,गेळे या तिन्ही गावांचा जमीन सातबारावर लवकरच एकत्रित होणार आहेत . आपण जे सांगितलं होतं ते करून दाखवलं असेही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थांनी श्री केसरकर यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकणार होता हा विश्वास आम्हाला होता आणि तुम्ही करून दाखवलात असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी. श्री पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम ,तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,तालुकाप्रमुख नारायण राणे ,सोनू गावडे विठ्ठल गावडे ,भिकाजी गावडे, भरत गावडे ,दिनेश गावडे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री गावडे, आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी गाव समितीला सर्व माहिती विशद केली. चौकूळ गावचा जमिनीचा प्रश्न आता कायमचा निघाली निघाल्यात जमा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# deepak kesarkar # chaukul #
Next Article