देव श्रीखाप्रेश्वर मंदिर पाडण्याचा मुद्दा संसदेत
मडगाव : पर्वरी येथील देव श्रीखाप्रेश्वर मंदिर पाडण्याच्या मुद्दा दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काल सोमवारी संसदेत उपस्थित केला आणि त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गाचा विस्तार कोळशाच्या वाहतुकीसाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की ‘या विस्ताराला चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी देव खाप्रेश्वर मंदिर पाडले. आणि मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे कशासाठी? ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात कोळसा गोव्यात मुरगांव बंदरावर आणला जातो. गोव्यातून शेजारील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात पाठविला जातो. त्यासाठी गोव्यात जेटी बांधल्या जातात, नवीन रेल्वेस्थानके बांधली जातात तसेच रस्त्यांचा विस्तार केला जातोय, त्यामुळे सुंदर गोव्याची हानी होत. रेल्वे विस्ताराविरूद्ध लढा देणाऱ्या एका महिला सरपंचावरगुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक यंत्रणा ही केंद्र सरकारची एजन्ट बनून वावरत असल्याचा आरोप त्यांनी केला.