For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेवटच्या दिवशी एनएसई आयपीओ 5.60 पट झाला सबस्क्राइब

06:52 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेवटच्या दिवशी एनएसई आयपीओ 5 60 पट झाला सबस्क्राइब
Advertisement

मुंबई : बहुचर्चित नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई यांचा आयपीओ सोमवारी शेवटच्या दिवशी दु. 3.45 पर्यंत 5.60 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनी या आयपीओतून 22 हजार 561 कोटी रुपये उभारणार आहे. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हा आयपीओ 6.49 पट, रिटेल गुंतवणूकदारांनी 1.25 पट सबस्क्राइब केला होता. पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आयपीओ 12.59 पट सबस्क्राइब केल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी एनएसईचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला झाला होता. सोमवारी गुंतवणुकीचा शेवटचा दिवस होता. या आयपीओकरीता समभागाची किमत 1700 ते 1785 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. ह्युंडाई मोटर इंडियानंतरचा हा सर्वात मोठा दुसरा आयपीओ ठरणार असल्याची माहिती आहे. ग्रे मार्केटमध्ये सोमवारी एनएसईचे समभाग 3.14 टक्के प्रिमीयमसह कार्यरत होते.

राखीव हिस्सेदारी

Advertisement

सदरचा आयपीओ हा 22561 कोटी रुपयांची उभारणी करणारा आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलअंतर्गत होणार असून 12.64 कोटी समभाग सादर केले आहेत. या आयपीओत पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के राखीव हिस्सेदारी, 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवली आहे. एनएसई आयपीओ अलॉटमेंटसंबंधी 22 रोजी निर्णय होऊ शकतो. समभाग 24 सप्टेंबर रोजी सुचीबद्ध होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

हे आहेत लीड मॅनेजर्स कोटक कॅपिटल, जेएम फायनॅन्शीयल, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया, सिटी ग्रुप, एचएसबीसी सेक्युरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया, एसबीआय कॅपिटल, आनंद राठी अॅडव्हायजर्स, अवेंडस कॅपिटल, अॅक्सिस कॅपिटल, डीएएम कॅपिटल, इक्वीरस कॅपिटल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय सेक्युरिटीज, आयडीबीआय कॅपिटल, आयआयएफएल कॅपिटल, मोतीलाल ओसवाल, न्युवामा वेल्थ, पँटोमाथ कॅपिटल व 360 वन डब्ल्यूएएम हे आयपीओचे लीड मॅनेजर्स आहेत.

Advertisement
Tags :

.