For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आधार हाऊसिंग’चा आयपीओ 8 मे रोजी होणार खुला

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आधार हाऊसिंग’चा आयपीओ 8 मे रोजी होणार खुला
Advertisement

3000 कोटी रुपयांची उभारणी करणार : किमान गुंतवणूक गरज 14,805 रुपयांची

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

वित्त कंपनी आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ 8 मे रोजी उघडणार आहे. कंपनीला याद्वारे 3,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. या आयपीओमध्ये, कंपनी 1,000 कोटींचे 3.17 कोटी नवीन समभाग सादर करणार आहे. त्याचवेळी, ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसद्वारे, कंपनी 6.35 कोटी समभागांची विक्री करून 2,000 कोटी रुपये उभारेल. किरकोळ गुंतवणूकदार 8 मे ते 10 मे या कालावधीत या आयपीओसाठी बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स 15 मे रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जातील.

Advertisement

किमान आणि कमाल किती रक्कम गुंतवली जाऊ शकते?

कंपनीने या आयपीओची किंमत 300 ते 315 प्रति समभाग निश्चित केली आहे. आयपीओच्या वरच्या प्राइस बँडवर 315 वर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला रुपये 14,805 ची गुंतवणूक करावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी, म्हणजे 611 शेअर्ससाठी बोली लावू शकतात, ज्यासाठी त्यांना 199,892 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव

कंपनीचा जास्तीत जास्त 50 टक्के आयपीओ पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय, किमान 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे आणि उर्वरित 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

Advertisement
Tags :

.