Kolhapur : इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरच संपणार – माजी मंत्री प्रकाश आवाडे
इचलकरंजीत सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा
इचलकरंजी : गावभागातील नागरिकांनाव शेतकरी वर्गाला सातत्याने सतावणारा महापुराचा प्रश्न यशोदा पुलामुळे मार्गी लागला आहे. आता पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलकुंभ उभारणीचे काम सुरु असून नजीकच्या काळात संपूर्ण इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा प्रश्नही कायमस्वरुपी संपेल असा विश्वास माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपा महायुतीचे उमेदवार पुनम सचिन माळी, सुशांत बाळासाहेब कलागते, शुभांगी किशोर पाटील, अरुणा प्रमोद बचाटे आणि अनिकेत बाबासो पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात शामराव कुलकर्णी, सानिकाआवाडे, संतोष कांदेकर, रमा फाटक आदींनी आपल्या मनोगतात झालेल्या विकासकामांचा आढावा घेत. अशी कामे पुढील काळातही होण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. भविष्यात गावभागचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून सर्वांगिण विकास साधला जाईल, असेही सांगितले. यावेळी प्रकाश दत्तवाडे, सीमा कमते, वर्षा जोंग, नामदेव सातपुते, भरत तमायचे, नरसिंह पारीक, राजेंद्र बचाटे, डॉ. राजू पुजारी, प्रकाश निकम, दिपक राशिनकर, नंदू पाटील, सचिन माळी, प्रमोद बचाटे, राजेंद्र जोंग आदींसह भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.