महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘पीएम किसान’चा हप्ता मंगळवारी मिळणार

06:39 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाराणसीमध्ये किसान मेळाव्याचे आयोजन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता 2,000 रुपयांचा 17 वा हप्ता येत्या मंगळवारी म्हणजेच 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी वाराणसी येथे जाणार आहेत. तेथे किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून तेथूनच डीबीटीद्वारे पीएम किसानची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार विराजमान होताच पंतप्रधानांनी 17 वा हप्ता जारी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. त्यानुसार या योजनेशी संबंधित कोट्यावधी शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी दिली होती. याचा फायदा 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार असून सुमारे 20,000 कोटी ऊपये वितरित केले जातील. किसान सन्मान निधी अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून तीनवेळा 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो. केंद्र सरकारने निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी योजनेचा 16 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर आता नवीन सरकार स्थानापन्न होताच किसान सन्मान निधीच्या फाईलवर सर्वप्रथम स्वाक्षरी करून पंतप्रधानांनी आपल्या सरकारला सर्वप्रथम शेतकऱ्यांची काळजी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article