For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुटबॉलपटू केदारची प्रेरणादायी धडपड

01:27 PM Aug 01, 2025 IST | Radhika Patil
फुटबॉलपटू केदारची प्रेरणादायी धडपड
Advertisement

कोल्हापूर / संग्राम काटकर :

Advertisement

आपले शिक्षण, फुटबॉल प्रॅक्टिस याचबरोबर आईवडिलांना वडापाव च्या गाड्यावर मदत करणारा फुटबॉलपटू त्याच्या वयातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे. केदार सोनाळे अमृतसर येथे ऑल इंडिया फुटबॉ ल फेडरेशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कनिष्ठ मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळला आहे. केदार हा डिफेन्सपटू म्हणून नाव कमवत आहे.

घरची परिस्थिती जेमतेम. आई वडिलांचा वडापा, दाबेलीचा गाडा. हातावरचे पोट असलेल्या कुटुंबात जन्मलेला केदार फुटबॉलपटू होण्यासाठी एक शिबिर कारणीभूत ठरले.

Advertisement

२०१५ साली बालगोपाल तालीम मंडळाचे माजी खेळाडू व प्रशिक्षक बाबुराव पाटील यांनी लहान मुलांमध्ये फुटबॉल रुजवण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये केदार आपला मोठा भाऊ प्रथम सोनाळेसोबत सहभागी झाला. यावेळी केदार पाच वर्षाचा होता. हेच वय त्याला एक फुटबॉ लपटू बनण्यासाठी खुणावणारे ठरले. पेटाळा मैदानामध्ये प्रशिक्षक सिद्धेश इंगवले यांच्याकडून मिळत राहिलेल्या प्रशिक्षणामुळे केदार शालेय स्पर्धेत खेळू शकेल इतका तयार झाला. त्याने डिफेन्सला खेळण्याचे ठरवले. चेंडू ताकतीने मारणे, चेंडू ताब्यात घेणे, विरुद्ध संघाच्या खेळाडूंना टॅकल करणे, असे कौशल्यही आत्मसात केले. एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर केदारने हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघात स्थान मिळवले. मनपास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत हायस्कूलने मिळवलेल्या उपविजेतेपदासाठी इतर खेळाडूप्प्रमाणे केदारचाही खेळही महत्वपूर्ण ठरला. केदार फुटबॉल खेळत धावण्याचा सराव असे. मनपास्तरीय शालेय १४ वर्षाखालील मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेतील १०० व २०० मीटर धावणेत पहिला क्रमांक मिळवला. विभागीय स्पर्धेतही १०० मीटर धावणेत तिसरा आणि २०० मीटर धावणेत पाचवा क्रमांक पटकावला.

मनपास्तरीय १४ वर्षाखालील मुलांच्या सेपक टकरा स्पर्धेतही लोहिया हायस्कूलच्या संघातून तो खेळला.फुटबॉलचा सराव करतानाच सायंकाळी मिरजकर तिकटीवरील आई-वडिलांसह आजी प्रभावती सोनाळे यांच्या वडापाव, दाबेली विक्री व्यवसायाला मदतीचा हात देऊ लागला.

  • केएसएकडून संधी, महाराष्ट्र संघात मिळवले स्थान

नववीसाठी त्याने महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पहाटे फुटबॉलचा सराव, शिकवणी, शाळा आणि सायंकाळी आई-वडिलांच्या मिरजकर तिकटी येथील वडापाव, दाबेली विक्रीच्या व्यवसायाला मदत आणि रात्री अभ्यास त्याचा दिनक्रम बनला. हा दिनक्रम आजही सुरूच आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र हायस्कूलच्या संघात त्याने स्थान मिळवून मनपास्तरीय सुब्रतो मुखर्जी शालेय १५ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना विरुद्ध संघाच्या खेळाडूला गोल करण्यापासून रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. एका सामन्यात त्याने विरुद्ध संघावर गोल करून हायस्कूलच्या सामना जिंकून दिला. गतवर्षी शिरपूर (जि. धुळे) येथे झालेल्या आंतरजिल्हा कनिष्ठ मुलांची फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने कोल्हापूर जिल्हा केएसए संघ निवड चाचणीचे आयोजन केले होते. यातही केदारने उत्कृष्ट खेळ करत केएसए संघात स्थान मिळवले. डिसेंबर २०२४ साली झालेल्या आंतरजिल्हा कनिष्ठ मुलांच्या फुटबॉ ल स्पर्धेत केदारने केएसए संघातून खेळताना उत्कृष्ट खेळ केला. त्याची दखल वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) समितीने घेऊन त्याला महाराष्ट्र संघ निवड चाचणीचे निमंत्रण दिले. त्यानुसार मुंबईतील कुपरेज मैदानात झालेल्या चाचणीत सहभागी होऊन त्यातील सामन्यांमध्येही जोमदार खेळ करत महाराष्ट्र संघ स्थानही दिले. अमृतसर (पंजाब) येथे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित राष्ट्रीय कनिष्ठ मुलांच्या फुटबॉल अजिंक्यपद डॉ. बी. सी. रॉय ट्रॉफी टीयर-वन स्पर्धेत मिझोरोम संघाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संध मिळाली. या संधीचा फायदा उठवत महाराष्ट्र संघावर मिझोरोमच्या खेळाडूंनी केलेल्या चाली चपळाईने रोखल्या.

पंजाबहून कोल्हापुरात परतल्यानंतर नुकत्याच झालेल्या मनपारतरीय सुब्रतो मुखर्जी १७वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलच्या संघातून खेळला. यामध्येही उठावदार खेळ करत विरुद्ध शालेय संघांना आपल्या संघावर गोल करण्याची संधी दिली नाही. केदार आपले भावी लक्ष सांगताना म्हणाला की, आयलीग, इंडियन सुपर लीग (आयएसएल) खेळण्याची तयारी करणार आहे. क्रीडा शिक्षक सचिन शिंदे, प्रदीप साळोखे, प्रशिक्षक संतोष पोवार, सिद्धेश इंगवले आणि शरद मेढे यांच्याकडून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे माझा फुटबॉलमधील पाया भक्कम झाला आहे.

केदार हा फुटबॉल खेळताना आपला अभ्यास ही न चुकता करतो. आम्हाला व्यवसायात मदत करताना त्याला कमीपणा वाटत नाही. त्याने एनसीसीमध्ये ही चांगली कामगिरी केली आहे. नववीत शिकताना तो एनसीसी सारजेंट होता. एनसीसी भवन येथे झालेल्या एनसीसी कॅम्पमध्ये तर त्याने बेस्ट इन ड्रिल उत्तम पद्धतीने करत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याला फुटबॉलमध्ये करिअर करण्याची संधी तर देऊच. शिवाय त्याला भारतीय सैन्य दलातही दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

                                                                                 - संग्राम सोनाळे व गिता सोनाळे (केदारचे आई व वडील)

Advertisement
Tags :

.