For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खामेनेईंच्या खात्म्याची इनसाइड स्टोरी

06:22 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
खामेनेईंच्या खात्म्याची इनसाइड स्टोरी
Advertisement

सैदी युवराज अन् इस्रायलकडून वारंवार ट्रम्प यांना फोन

Advertisement

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूने पूर्ण जगाला हादरविले आहे. परंतु आता या सर्जिकल स्ट्राइकमधील इनसाइड स्टोरी समोर आली असून ती चकित करणारी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ल्याचा निर्णय एका रात्रीत घेण्यात आला नव्हता, तर यामागे सौदी अरेबिया आणि इस्रायलची अनेक आठवड्यांची गुप्त कूटनीति आणि मोठा दबाव होता.

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी मागील एक महिन्यात ट्रम्प यांना अनेक खासगी फोन कॉल केले. परंतु सौदी अरेबिया सार्वजनिक स्वरुपात कूटनीति आणि शांततेचा पुरस्कार करत होता. पण पडद्याआडून युवराज सलमान सातत्याने ट्रम्प यांच्यावर सैन्य कारवाईसाठी दबाव निर्माण करत होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू देखील दीर्घकाळापासून अमेरिकेला इराणविरोधात थेट कारवाईसाठी गळ घालत होते. या दोन प्रमुख सहकाऱ्यांच्या लॉबिंगने अखेर ट्रम्प यांना या ऐतिहासिक स्ट्राइकसाठी तयार केले.

Advertisement

इराणचे सर्वोच्च नेते हयात असेपर्यंत इस्लामच्या नावावर मुस्लीम देशांना एकजूट करण्याचा प्रयत्न करत राहिले. परंतु आता सौदी अरेबियाच्या दबावामुळेच ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेने हल्ला न केल्यास इराण आणखी शक्तिशाली होणार असल्याचे सलमान यांनी ट्रम्प यांना सांगितले होते. इराणने प्रत्युत्तरादाखल हल्ला केल्यास सौदी अरेबिया तेलाचा पुरवठा आणि क्षेत्रीय सुरक्षा सांभाळण्यास मदत करणार असल्याचे आश्वासन सलमान यांनी अमेरिकेला दिले होते. सलमान यांनी ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनरसोबत स्वत:च्या घनिष्ठ संबंधांचा वापर करत व्हाइट हाउसमध्ये स्वत:चे म्हणणे मजबुतीने मांडले होते.

खामेनेईंचा खात्मा अन् क्षेत्रीय समीकरण

अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यात 86 वर्षीय खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी याला इराणच्या लोकांसाठी स्वत:चा देश परत मिळविण्याची मोठी संधी ठरविले आहे. या हल्ल्यानंतर इराणने शेजारी मुस्लीम देशांमधील अमेरिकन आणि इस्रायलच्या तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले, मग सौदी अरेबियासमवेत अनेक मुस्लीम देशांनी इराणवर कठोर टीका केली आहे.

सौदी-युएई एकजुटता अन् इराणशी शत्रुत्व

या तणावादरम्यान सौदी अरेबियाचे युवराज आणि युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद यांच्यात चर्चा झाली असून त्यांनी इराणच्या हल्ल्यांना ‘क्षेत्रीय सुरक्षेसाठी धोका’ ठरवत एकजुटता व्यक्त केली. ही प्रतिक्रिया दशकांपेक्षा जुनी सौदी-इराण यांच्यातील शत्रुत्व दर्शविणारी असून विश्लेषक याला ‘नवे शीतयुद्ध’ म्हणत आले आहेत. एकीकडे सौदी अरेबिया स्वत:ला सुन्नी जगताचा संरक्षक मानतो, तर इराण शियाशक्तीचे केंद्र आहे. या सांप्रदायिक आणि राजकीय विभाजनामुळेच मध्यपूर्व अशास्थितीत पोहोचले आहे, जेथे इराणच्या सर्वोच्च नेत्याचा खात्मा झाला आणि त्याचे शेजारी त्याच्यावरच टीका करत आहेत.

Advertisement
Tags :

.