For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Tourism : अंबाबाई दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम

04:17 PM Feb 01, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur tourism   अंबाबाई दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम
Advertisement

                                    अंबाबाई दर्शनासह जोतिबा, पन्हाळ्याला पसंती

Advertisement

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी अजूनही भाविकांची गर्दी झालेली दिसत आहे. नाताळ, नववर्ष व सलग सुट्टया यामुळे कोल्हापूर शहर हाऊसफुल्ल झाले होते. पण आता मुलांच्या परीक्षा असल्याने, ही गर्दी कमी झाली आहे. शनिवार-रविवार या सुट्टीमुळे भाविक व पर्यटकांच्या गर्दीचा ओघ सुरू आहे. शनिवारी अंबाबाई दर्शनासाठी गर्दी झालेली दिसत होती.

पुणे, मुंबई व कर्नाटक येथील भाविक, पर्यटक आजही कोल्हापूरात दाखल होत आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन, हे भाविक, पर्यटक कणेरी मठ, जोतिबा डोंगर, आदमापूर येथील बाळूमामा, नृसिंहवाडी, पन्हाळा येथे वेळ काढून भेट देत आहेत. त्याचबरोबर महाव्दार रोड, जोतिबा रोड, रंकाळा, चप्पल लाईन येथे खाऊ गल्ली व खरेदीला गर्दी झालेली दिसत होती. यामुळे शहरातील हॉटेल्स, यात्री निवास येथे गर्दी होती. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक मंदिरामध्ये दाखल झाले होते. नाताळ, नववर्ष, सलग सुट्टीमुळे कोल्हापूर फुल्ल झाले

Advertisement

पार्किंगबाबत नाराजी
कोल्हापूरी मिसळ, वडापाव तसेच आप्पेवर ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी झालेली दिसत होती. पार्किंगचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. यामुळे बाहेरील भाविक, पर्यटक पार्किंगबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. डिसेंबरमध्ये भाविक व पर्यटकांनी लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. पण आता जानेवारी महिना संपला असून, आता मुलांच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होत आहेत. यामुळे गर्दीचा ओघ थोडा कमी झालेला दिसत आहे. काही शाळांच्या सहली कोल्हापूरात दाखल झाल्या आहेत. होते. सध्या अंबाबाई मंदिराच्या दुरूस्तीचे कामसुरू आहे. तर गरूड मंडपाचे कामही अंतिमटप्यात आहे. यासाठी १४३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

Advertisement
Tags :

.