For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इनफिनीक्स हॉट 11 आज होणार लाँच

07:00 AM Apr 15, 2022 IST | Tarun Bharat Portal
इनफिनीक्स हॉट 11 आज होणार लाँच
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

इनफिनीक्स हॉट 11 2022 या स्मार्टफोनबाबत वर्षाच्या सुरुवातीपासून जोरदार चर्चा होती. अखेर सदरचा फोन आज अर्थात 15 एप्रिल रोजी सादर केला जाणार असल्याचे समजते. 48 मेगापिक्सल कॅमेऱयासह 5 हजार एमएएच बॅटरीसह 11 हजार रुपयांपर्यंत किंमतीला हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.

फ्लीपकार्टवर हा फोन विक्रीसाठी 15 एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. अनेकविध चांगली वैशिष्टय़े यात असणार आहेत. 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले यात असेल.

Advertisement

5 हजार एमएएचची बॅटरी

फोनमध्ये 5 हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली असून हा युएसबी चार्जिंग पोर्टसह येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची व्यवस्था आहे. युनीसेक टी 700 चिपसेट यात असण्याची शक्यता असून फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा पंट कॅमेरा देण्यात येणार आहे.

किती असेल किंमत

सदरच्या फोनची किमत ही 10 हजार 999 रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. 10 हजारच्या गटात हा नवा फोन रियलमी सी 20, रेडमी 9 ए यांच्यासह इतरांशी स्पर्धा करणार आहे.

तीन रंगात येणार

सदरचा नवा स्मार्टफोन ऑरोरा ग्रीन, पोलर ब्लॅक आणि सनसेट गोल्ड या रंगात सादर केला जाणार असल्याचे समजते.

इतर सुविधा....

  • बायोमेट्रीक सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर
  • फोनच्या मागे स्क्वेयर शेप कॅमेरा मॉडय़ूल
  • दोन कॅमेरे व एक एलइडी फ्लॅश
Advertisement
Tags :

.