For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वदेशी तेजस पुन्हा करणार उड्डाण

06:07 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वदेशी तेजस पुन्हा करणार उड्डाण
Advertisement

एचएएल प्रमुखांकडून गूड न्यूज : तांत्रिक समस्या दूर करण्यात आल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील यांनी तेजस लढाऊ विमान भारतीय वायुदलासाठी पुन्हा उड्डाण करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. एक आठवड्याच्या आत तेजसला पुन्हा संचालनासाठी आवश्यक मंजुरी मिळेल. लोकल मॉडिफिकेशन कमिटी या प्रक्रियेला हाताळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement

तेजस लढाऊ विमानाच्या ताफ्याला बुधवारपर्यंत उड्डाणाची अनुमती मिळण्याची अपेक्षा असल्याचे सुनील यांनी सांगितले आहे. फेब्रुवारी महिन्यात तेजस लढाऊ विमानाशी संबंधित एका घटनेनंतर या विमानाच्या उ•ाणांना रोखण्याचे पाऊल उचलण्यात आले होते.

एक तांत्रिक समस्या होती, ती दूर करण्यासाठी समिती काम करत असून आता यावर लोकल मॉडिफिकेशन कमिटीत चर्चा झाली आहे. पुढील आठवड्यापर्यंत काही तपासण्या करण्यात येतील आणि तेजस पुन्हा झेपावेल अशी अपेक्षा आहे.

डी. के. सुनील, एचएएल प्रमुख

वायुदलाकडे एकूण 36 तेजस एमके1

-भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 32 तेजस मार्क1 लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स

-वायुदलाच्या ताफ्यात तेजस मार्क1 ची 4 प्रशिक्षण विमाने देखील आहेत.

-एचएएलकडून लवकरच आणखी तेजस विमानांचा पुरवठा केला जाणार

एका घटनेनंतर उ•ाण रोखले

- फेब्रुवारीमध्ये एलसीए तेजस विमानांचे संचालन धावपट्टीच्या एका घटनेनंतर रोखण्यात आले होते.

- हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने या घटनेला किरकोळ तांत्रिक घटना ठरविले होते.

- सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय वायुदलाने तेजस लढाऊ विमानांचा वापर रोखण्याचा निर्णय घेतला होता

लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मार्क 1

-हे 4.5 पिढीचे ऑल वेदर, बहुउद्देशीय लढाऊ विमान

-आक्रमक एअरस्ट्राइक सपोर्ट, क्लोज कॉम्बॅटसाठी डिझाइन

-ग्राऊंड मेरीटाइम ऑपरेशनसाठीही लढाऊ विमान उपयुक्त

-याच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचे उत्पादन अन् विकास होतोय

-तेजस एलसीए एमके1ए याचे सर्वात आधुनिक वर्जन

एलसीए एमके1ए

तेजस लढाऊ विमानात एईएसए रडार, रडार वॉर्निंगचे इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट, सेल्फ प्रोटेक्शन जॅमिंग, डिजिटल मॅप जनरेटर, स्मार्ट मल्टी-फंक्शन डिस्प्ले, कंबांइंड इंटेरोगेटर आणि ट्रान्सपॉन्डर, अॅडव्हान्स्ड अल्टीमीटर आणि अन्य अत्याधुनिक उपकरणे लावण्यात आली आहेत.

-वायुदल आणि नौदलासाठी हे सिंगल सीटर लढाऊ विमान आहे.

-वायुदल आणि नौदलासाठी तेजस मार्क1ए ट्रेनर दोन आसनी विमान

Advertisement

.