For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय वस्त्रद्योग : परंपरा आणि भावी आव्हाने

06:16 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय वस्त्रद्योग   परंपरा आणि भावी आव्हाने
Advertisement

बारावा राष्ट्रीय हातमाग दिवस 7 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करण्यात आला. प्रत्येक धागा एक कहानी सांगतो तसेच प्रत्येक विणकाम एक वारसा जपतो, यासारख्या मुख्य घोषणा आणि संकल्पनांवर यावर्षी लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यासोबतच माझा हातमाग, माझा अभिमान, हातमागाची वस्त्रs परिधान करा आणि अभिमान बाळगा तसेच वारसाविना भविष्य सशक्त करा, यासारख्या घोषणांमुळे देशभर नवचैतन्य निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी प्रत्येकाने भारतीय वस्त्र खादी हातमाग यावर विणलेल्या स्वदेशी वस्त्रांची खरेदी करण्याचे आवाहन केले आहे ते अर्थपूर्ण आहे.

Advertisement

भारतीय वस्त्राsद्योग हा जगातील एक प्रमुख उद्योग असून विशेषत: रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात भारतीय वस्त्राsद्योग एका नव्या वळणावर उभा आहे. जागतिक उद्योगांच्या रांगेत वस्त्राsद्योगाला अनेक नवीन संक्रमणातून वाटचाल करावी लागत आहे. उत्पादनक्षमता आणि आधुनिकीकरणाचे आव्हान सर्वात मोठे असून चीन, बांगलादेश, व्हिएतनाम सारख्या देशांच्या वस्त्राsद्योगाशी स्पर्धा करून आपला अव्वल दर्जा टिकविणे आवश्यक आहे. भारतीय वस्त्राsद्योग क्षेत्र देशाच्या एकूण जीडीपीमध्ये दोन ते तीन टक्के योगदान देते. यावरून त्याचे विकासातील स्थान अधोरेखित करता येते आणि सुमारे 45 दशलक्षापेक्षा अधिक भारतीयांना थेट रोजगार प्राप्त करून देणारा असा हा महत्त्वाचा उद्योग आहे. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये एकूण वस्त्राने तयार कपड्यांची निर्यात ही 35.5 अमेरिकन अब्ज

डॉलर्स एवढी उच्च शिखरावर पोहोचली होती. आता भारताने सबंध युरोप बरोबर मुक्त व्यापार करार केला आहे आणि जगातील अन्य 14 देशांशी मुक्त व्यापार करार केल्यामुळे या वस्त्राद्योगाला भविष्यात सोन्याचे दिवस येणार असे चित्र निर्माण झाले आहे. विशेषत: गेल्या 12 वर्षात नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमुळे भारतातील खादी उत्पादन विक्रमी स्तरावर वाढले. देशात तसेच देशाबाहेर खादी वस्त्रांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे शिवाय भारतीय तयार कपडे हे सुद्धा जगात लोकप्रिय होत आहेत. मुक्त व्यापार करारामुळे भारतीय कापड उद्योगाची निर्यात वाढेल आणि त्याबरोबर भारताला होणारा आर्थिक लाभसुद्धा भारताचे आर्थिक स्थान मजबूत करण्यासाठी फलदायी ठरू शकेल.

Advertisement

तेजस्वी असा इतिहास

भारतीय वस्त्राsद्योगाचा इतिहास तेजस्वी आहे. विशेषत: प्राचीन आणि मध्ययुगीन काळात भारतीय वस्त्राsद्योगांनी सबंध जगाची बाजारपेठ काबीज केली होती. भारतीय वस्त्राsद्योगाचा उगम हा थेट सिंधू संस्कृतीपर्यंत मागे नेता येतो. त्या कालखंडात भारतातील वस्त्रs जगभर विकली जात असत तसेच कापसाची मोठ्या प्रमाणावर होणारी लागवड आणि सूत कातण्याची प्रगत पद्धती व त्याचे पुरावे हे सिंधू संस्कृतीच्या काळापासून मिळतात. भारतीय ऋषीमुनींनी कापसाचा शोध लावून त्या आधारे वस्त्रs बनविण्याची कला महाराष्ट्रातील विदर्भात यवतमाळ येथे विकसित केल्याचे संदर्भ सापडतात. सातवाहन काळामध्ये महाराष्ट्रातील पैठण येथे तयार होणारी पैठणी ही इटलीतील रोमच्या बाजारपेठेत एवढी लोकप्रिय होती की तेथील संसदेने कायदा करून या वस्त्रावर जकात लावला होता. तथापि उच्च दराच्या आणि उच्च किमतीच्या या महावस्त्राची मागणी काही घटली नाही. सातवाहन काळातील जीडीपी 22 टक्केपर्यंत पोहोचला होता आणि मराठवाडा विभागातील 22 महानगरे ही जागतिक व्यापाराची केंद्रे होती. सातवाहन काळात मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात सलग असा आर्थिक समृद्धीचा पट्टा विकसित झाला होता. येथे वस्त्राsद्योग व कला ही उच्च कोटीच्या शिखरावर पोहचली होती. दर्जा, गुणवत्ता आणि निर्यात क्षमता या दृष्टीने या वस्त्राsद्योगात निर्यात मूल्य श्रेष्ठ होते. वर्तमान काळात या भागात अशा मोठ्या उद्योगांची स्थापना करणे आवश्यक आहे.

नाना फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे निजाम काळात संकटात सापडलेल्या पैठणी उद्योगातील कलावंतांना त्यांनी येवला येथे स्थलांतरित केले आणि पुढे येवला हे पैठणी निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. मध्ययुगात मुघल साम्राज्याच्या काळात हातमाग आणि उत्तम प्रतीच्या तलम मलमल कापडांचा विकास करण्यात आला. ब्रिटिश राजवटीने भारताला कच्च्या कापसाचा निर्यातदार देश बनविले. त्याचवेळी त्यांनी देशांतर्गत बाजारपेठेतील पारंपरिक वस्त्राsद्योगांवर अवाच्या सव्वा कर लावून देशी उद्योग बुडविले. भारतीय बाजारपेठेत स्वस्त यंत्र निर्मित कापडांचा इंग्रजांनी महापूर आणला आणि स्थानिक हस्तकला चिरडून टाकल्या. लोकमान्य टिळकांनी केसरीत लिहिलेल्या अग्रलेखात असे म्हटले होते की, इंग्रजांच्या दुष्ट धोरणामुळे देशी उद्योग बुडाले. सावकारही मेला आणि शेतकरीही मेले, ब्रिटिशांचे धोरण भारताला कंगाल करणारे होते.

संधी आणि आव्हाने

सद्यस्थितीमध्ये वस्त्राsद्योगात अनेक नव्या संधी आहेत तसेच नवीन नवीन आव्हानेही आहेत. औद्योगिक उत्पादनाच्या सुमारे सात टक्के आणि एकूण निर्यात उत्पादनाच्या 12 टक्के एवढे गेल्या काही वर्षातील वस्त्राsद्योगाचे स्थान आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास भारत हा कापूस आणि तागाच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादक देशांपैकी एक आहे तसेच तयार कपडे आणि सुती वस्त्र यांचा एक प्रमुख जागतिक निर्यातदार आहे. अलीकडे या क्षेत्रातील उदयोन्मुख उत्पादन क्षेत्रांचा विचार करता भारत सरकारने उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आखली आहे. यासारख्या केंद्र सरकारच्या योजनांमुळे वस्त्राsद्योग विकास चौकटींना वाढते पाठबळ मिळत आहे तसेच मानवनिर्मित फायबर वस्त्रs उत्पादन प्रक्रियेत जलद वाढ दिसून येत आहे. जगभरात भारतीय हस्तकला आणि विणकामावर आधारित वस्त्रांना पुन्हा नवी मागणी येत आहे. जागतिक पातळीवर इ मार्केटिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून होणाऱ्या जाहिरातीमुळे भारतीय वस्त्रs जगभरातून थेट लोकप्रिय होत आहेत. भारतीय उद्योजकांना व खास करून महिलांना घरबसल्या वस्त्राsद्योगात सहभाग घेणे शक्य झाले आहे. भारतीय वस्त्राsद्योगापुढे अनेक कठीण आव्हाने उभी आहेत. प्रामुख्याने विखंडित परिसंस्था हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. एकमेकापासून अलग आणि विलगपणे काम करणाऱ्या लहान आणि सूक्ष्म उद्योगांचे आपल्या ब्रँड उत्पादनांचे रक्षण आणि आक्रमक वर्चस्व प्रस्थापित करण्याची गरज आहे. महागडा कच्चामाल हे आणखी एक महत्त्वाचे आव्हान आहे. चीन आणि व्हीएतनाम सारख्या प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत उत्पादन करताना स्थानिक मानवनिर्मित तंतू आणि

पॉलिस्टर घटकांना किमतीच्या बाबतीत तोटा सहन करावा लागत आहे. भारतात असा कच्चामाल तयार करणे आवश्यक आहे शिवाय कालबाह्य तंत्रज्ञान हे सुद्धा आणखी एक महत्त्वाचे आव्हान आहे. विणकाम आणि प्रक्रिया क्षेत्रे यामध्ये होत असलेले क्रांतिकारक बदल पाहता जुन्या तंत्रज्ञानावर व कमी खर्चाच्या स्वयंचलित असलेल्या पारंपरिक यंत्र मागावर असलेले मोठ्या प्रमाणावरचे अवलंबित्व कमी केले पाहिजे. त्यासाठी जुन्या नव्या तंत्रात सुंदर समन्वय साधून आपल्या कलांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.