For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय संघाने केलं निराश!

06:01 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय संघाने केलं निराश
Advertisement

ंटी-20 क्रिकेटचा सर्वात छोटा प्रकार 7 ते 8 चेंडू किंवा फक्त एखादा फलंदाज किंवा गोलंदाज सामन्याचे चित्र पालटवणारा हा प्रकार.परंतु ज्यावेळी दोन सर्वोत्तम संघ एकमेका समोर उभे राहतात त्यावेळी तो प्रकार मोठा वाटतो. फलंदाजी आणि गोलंदाजीतील दोन सर्वोत्तम संघ आपण बघत होतो. परंतु यात उजवा ठरला तो आफ्रिका, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम हम म्हणणारा आफ्रिकन संघ पहिल्या तीन षटकातच कमालीचा गांगरला. भारतीय संघासाठी बुमराह नामक डॉलरने पहिल्या चार षटकातच आफ्रिकेच्या संघातील हवाच काढून घेतली. पहिले बाद होणारे फलंदाज हे  रथी महारथीच होते. पहिले तीन गडी बाद झाल्यानंतर मिलरने केलेल्या पिटाई नंतर आपण जिंकतोय की उध्वस्त होतोय हे समजत नव्हतं. भारतीय संघाने सुरुवातीलाच आफ्रिकाच्या अहंकाराला जखम केली. परंतु मिलरने भारतीयांना झोडपत, भारतीयांना जखम देत मीठ मसाला चोळण्याचे काम केलं. आपण जिंकू ना? असं क्षणभर मी माझ्या मनाला विचारलं. आणि अर्थात ते अखेर खरंच ठरलं. मिलरने या सामन्यात उद्धटपणा, आक्रमकपणा, आणि खराब परिस्थितीत भारतीय गोलंदाजीवर केलेले राज्य हे निश्चितच कौतुकास्पद. परंतु त्या राज्यावर मिलर बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाजांना प्रभुत्व राखता आल नाही.

Advertisement

188 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने शिंतोडे अंगावर उडवून घेतले. आज भलेही अभिषेक शून्यावर बाद झाला नसेल परंतु खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करणं हे त्याने ऑप्शनला टाकलेले दिसते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कंपनीने आफ्रिकेच्या गोलंदाजी समोर गुडघे टेकले.एनगिडी आणी यासन यांच्या समोर आक्रमकता दाखवावी कि संयम या पेचात भारतीय फलंदाज फसले. आफ्रिकेच्या विजयाचे पूर्ण श्रेयहे निश्चितच त्यांच्या गोलंदाजांना आणि  क्षेत्ररक्षकांना  द्यावे लागेल. एक काळ असा होता कि ऑस्ट्रेलिया संघाला हरवण म्हणजे वाघाच्या शिकारी सारखं वाटायचं. आता त्याच ऑस्ट्रेलियाची जागा हळूहळू दक्षिण आफ्रिका घेऊ लागली कि काय अशी शंका येऊ लागली आहे, थोडक्यात सुरुवातीच्या अचूक माऱ्यानंतरसुद्धा भारतीयांची अपरिपक्व गोलंदाजी आणि फलंदाजांनी केलेली निराशा भारतीय पराभवास कारणीभूत ठरली एवढं मात्र खरं! या पराभवातून भारताची सुपर एट मधील पुढील वाटचाल मात्र कठीण असणार एवढा मात्र खरं.

Advertisement
Advertisement
Tags :

.