For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय वायुदल खरेदी करणार 1 हजार किलोचे बॉम्ब

06:13 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय वायुदल खरेदी करणार 1 हजार किलोचे बॉम्ब
Advertisement

इराण युद्धातून धडा : अमेरिकेच्या एमके-84 बॉम्बइतका शक्तिशाली

Advertisement

पश्चिम आशिया युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमधून भारताने अत्यंत मोठा धडा घेतला आहे. संघर्षावेळी शस्त्रास्त्रांची उपलब्धता आणि त्याची शक्ती किती आवश्यक असते हे या दोन्ही घटनांनी दाखवून दिले आहे. याचमुळे संरक्षण मंत्रालयाने आता भारतीय वायुदलाला आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

संरक्षण मंत्रालय स्वदेशी 1000 किलोचे हवाई बॉम्ब खरेदी करण्याच्या तयारीत आहे. हे बॉम्ब अमेरिकेच्या एमके-84 बॉम्बसारखे असतील, जे 2000 पाउंड म्हणजेच जवळपास 907 किलो विस्फोटक नेऊ शकतील. याचा अर्थ हे बॉम्ब शत्रूच्या मोठमोठ्या टार्गेटला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. आता भारत स्वत: या बॉम्बची निर्मिती करणार आहे, जेणेकरून विदेशातून खरेदीची आवश्यकता कमी होईल आणि वायुदल सदैव सज्ज राहिल.

Advertisement

किती हवाई बॉम्ब खरेदी होणार?

या स्वदेशी बॉम्बसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट संरक्षण मंत्रालयाने जारी केला आहे. याच्या अंतर्गत 1000 किलोचे 600 बॉम्ब निर्माण केले जातील आणि खरेदी करण्यात येतील. याच्यासोबत टेल यूनिट आणि अन्य आवश्यक उपकरणेही सामील असतील. हा पूर्ण प्रकल्प बाय इंडियन कॅटेगरीत चालणार आहे. यामुळे भारतीय कंपन्या वाटचाल करू शकतील आणि देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत होईल.

हवाई बॉम्ब अत्यंत धोकादायक

-हे नवे हवाई बॉम्ब स्वत:च तुकड्यांमध्ये विभागून फैलावणार आहेत, हे उच्च कॅलिबरचे असून ते अत्यंत तीव्र विस्फोट निर्माण करतात.

-टार्गेटवर मोठा प्रभाव पाडतात. हे बॉम्ब रशियन अन् पाश्चिमात्य दोन्ही प्रकारच्या विमानांवर जोडता येतील, जी वायुदलाकडे आहेत.

-भारतीय वायुदल अशाप्रकारचे एमके-84 क्लासचे बॉम्ब आतापर्यंत विदेशी कंपन्यांकडून खरेदी करत होते.

-स्वदेशी बॉम्ब उपलब्ध झाल्याने वायुदलाला अधिक विश्वास होईल आणि लॉजिस्टिक्सही सोपे ठरणार आहे.

-1000 किलो वजनाचे हे बॉम्ब शत्रूची मोठी ठिकाणे, पूल, धावपट्टी आणि गोदामांना एका झटक्यात नष्ट करू शकतात.

दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार खरेदी प्रक्रिया

या प्रकल्पाला दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 6 प्रोटोटाइप तयार केले जातील, ज्यात लाइव्हयुक्त आणि इनर्ट म्हणजेच विस्फोटकशिवाय दोन्ही प्रकारचे बॉम्ब असतील. याचबरोबर टेल यूनिट आणि अन्य उपकरणेही विकसित केली जातील. दुसऱ्या टप्प्यात सिंगल स्टेज कंपोजिट ट्रायल्स होतील आणि त्यानंतर एअर स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट्स म्हणजेच एएसक्यूआरची चाचणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कमीतकमी 50 टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात योग्य कंपन्यांना कमर्शियल रिक्वेस्ट फॉर प्रपोजल म्हणजेच आरएफपी जारी केला जाईल आणि एकूण 600 बॉम्ब खरेदी करण्यात येणार आहेत. ही खरेदी बाय इंडियन-आयडीडीएम श्रेणीत होईल, जे डीएपी 2020 नुसार सर्वाधिक स्वदेशीयुक्त माध्यम आहे.

वायुदलाला कधीपर्यंत मिळणार?

-प्रकल्प पूर्ण होण्यास जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागेल. ईओआय जारी होण्यापूर्वी करारावर स्वाक्षरी होईपर्यंत हा वेळ लागेल.

-यात प्रोटोटाइप तयार करणे, युजर ट्रायल्स करणे, मूल्यांकन, कमर्शियल प्रोसेस आणि अखेरीस करार अंतिम करणे सामील आहे.

-स्वदेशी विकास होत पुढे जात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी भारतीय वायुदल या प्रकल्पाला वेगाने पुढे नेत आहे.

-चाचणी भारतातच वायुदलाचे युनिट्स किंवा निश्चित ठिकाणावर होतील, तसेच वायुदलाच्या विमानांकडून चाचणी पार पडेल.

-हे स्वदेशी 1000 किलोचे बॉम्ब भारतीय वायुदलाला मोठी फायरपॉवर मिळवून देतील, विदेशी बॉम्बवर निर्भर रहावे लागणार नाही.

-भारतीय कंपन्याही सामील होऊ शकतात आणि विदेशी सहकार्याची अनुमती. डिझाइन अन् उत्पादन प्रामुख्याने भारतात करण्याची अट.

- कंपन्यांची इंजिनियरिंग क्षमता, सुविधा, इंटीग्रेशन क्षमता, स्वदेशी सामग्रीचे प्रमाण, आवश्यक मापदंडांचे पालन पाहिले जाणार.

Advertisement
Tags :

.