For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द इंडिया स्टोरी’ येतेय

06:13 AM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘द इंडिया स्टोरी’ येतेय
Advertisement

भारतातील अनेक रहस्यांची करणार उकल

Advertisement

द इंडिया स्टोरी या चित्रपटाच्या माध्यमातून श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. भारताच्या एका रहस्याची उकल करणारा चित्रपट अशी याची टॅगलाइन आहे. या चित्रपटाची काही पोस्टर्सही शेअर करण्यात आली आहेत. हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

द  इंडिया स्टोरी हा पॅन इंडिया चित्रपट असून तो हिंदीसोबत अनेक भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत असल्याने तिचे चाहते अत्यंत उत्सुक झाले आहेत. काजल मागील काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर राहिली आहे. परंतु काजल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

अभिनेता श्रेयस याचबरोबर वेलकम टू जंगल आणि गोलमाल 5 या चित्रपटांमध्ये काम करत आहे. श्रेयसला द इंडिया स्टोरी या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहे. मुख्य नायक म्हणून भूमिका साकारण्याची संधी त्याला या चित्रपटाद्वारे प्राप्त झाली आहे.

Advertisement
Tags :

.