For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्योगपती घनश्याम दालमिया यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर छापे

06:46 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
उद्योगपती घनश्याम दालमिया यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर छापे
Advertisement

3 कोटींची रोकड जप्त, 400 कोटींच्या घोटाळ्याचा संशय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रसिद्ध उद्योगपती घनश्याम दालमिया यांच्या घरावर आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित 28 ठिकाणी शनिवारी प्राप्तिकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन कोटी ऊपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. कोळसा व्यापार आणि वाहतूक क्षेत्राशी संबंधित असलेले प्रसिद्ध व्यापारी घनश्याम दालमिया यांच्या मिलेनियम सप्लायर प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीशी संबंधित प्रकरणात ही शोधमोहीम राबवली जात आहे. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोलकाता येथे आहे.

Advertisement

प्राप्तिकर विभागाने कोलकात्याशी संबंधित काही अधिकारी आणि कार्यालयांमध्येही शोधमोहीम राबवली आहे. घनश्याम दालमिया आणि त्यांची कंपनी मिलेनियम सप्लायर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सुमारे 350 ते 400 कोटी ऊपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन राज्यात एकाचवेळी 28 ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील सुंदरगड, राउरकेला, छत्तीसगडमधील रायगड, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एकाचवेळी शोधमोहीम राबवण्यात आली. याच शोधमोहिमेदरम्यान शनिवारी दालमिया यांच्या घरातून 3 कोटी ऊपयांची रोकडही जप्त करण्यात आली. सुऊवातीच्या चौकशीत 3 कोटी ऊपयांच्या रोख रकमेबाबत अचूक उत्तर न दिल्यामुळे ती प्राप्तिकर पथकाने जप्त केली आहे. याप्रकरणी विभागाकडून तपासाची प्रक्रिया सुरू आहे. या छाप्यादरम्यान तपासकर्त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली आहेत. हे संपूर्ण प्रकरण सुमारे 400 कोटी ऊपयांच्या करचुकवेगिरीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. या आरोपाचीही अत्यंत गांभीर्याने चौकशी केली जात आहे. या शोध मोहिमेदरम्यान प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कोट्यावधी ऊपयांच्या संशयास्पद व्यवहारांशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे सापडले आहेत. ज्याचा नंतर तपशीलवार शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.