For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओटवणे गणेश मंदिराच्या मंडपाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

02:26 PM Jan 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ओटवणे गणेश मंदिराच्या मंडपाचा लोकार्पण सोहळा उत्साहात
Advertisement

ओटवणे कापईवाडी गणेश मंदिर समिती व गणेश मंडळाचे उत्कृष्ट नियोजन

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

ओटवणे कापईवाडी येथील गणेश मंदिराच्या प्रशस्ओटवणे कापईवाडी येथील गणेश मंदिराच्या प्रशस्त मंडपाचा लोकार्पण सोहळात मंडपाचा लोकार्पण सोहळा ओटवणे माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर यांच्याहस्ते करण्यात आला. माघ गणेश जयंतीच्या सुवर्णपर्वणीला मान्यवरांच्या व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंडपाचा हा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.या मंदिरातील गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. तसेच या मंदिरातील सर्व धार्मिक उत्सवांना भाविकांची नेहमीच गर्दी असते. या मंदिर परिसरात मंडप नसल्यामुळे या देवस्थानच्या धार्मिक उत्सवात पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात भाविकांची गैरसोय होत होती. मात्र आता या गणेश मंदिर लगतच्या भव्य मंडपामुळे पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.यावेळी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रेश्मा सावंत, आर पी डी हायस्कूल व ज्यु कॉलेजच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल सावंत, सरपंच आत्माराम गांवकर, उपसरपंच संतोष गावकर, माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, गावप्रमुख रविंद्रनाथ गावकर, प्रकाश केळुसकर, नारायण कर्पे, स्वप्निल उपरकर, विश्राम केळुसकर, संदिप गवळी, प्रमोद केळुसकर, संतोष गवळी, सुनिल पंदारे, दशरथ शृंगारे, सगुण गांवकर, उमेश म्हापसेकर, प्रशांत बुराण, भिकाजी बिले, विश्वनाथ बोर्ये, नागेश वरेकर, गुरुनाथ बुराण, अमित कोटकर, समीर गावकर, सचिन गवळी आदीसह कापईवाडीतील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बालक कलाकारांसह महिला व युवकांच्या विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ओटवणे कापईवाडी येथील श्री गणेश मंदिर व्यवस्थापन समिती व श्री गणेश कला क्रीडा व विकास मंडळाने केले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.