For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौदी अरेबियाचा अभेद्य किल्ला

06:22 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सौदी अरेबियाचा अभेद्य किल्ला
Advertisement

इराणची क्षेपणास्त्र आकाशातच नष्ट : हवाई सुरक्षा यंत्रणेमुळे सुरक्षित

Advertisement

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल इराण आखाती देशांवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अमेरिकेच्या दूतावासाला इराणने लक्ष्य केले आहे. तर सौदी अरेबियाचा सर्वात मोट तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही इराणने हल्ला केला आहे. इराणची क्षेपणास्त्रs अन् ड्रोन्स सातत्याने आखाती देशांना लक्ष्य करत आहेत. यातील काही क्षेपणास्त्रs जमिनीवर कोसळली असली तरीही बहुतांश क्षेपणास्त्रांना रोखण्यास सौदीला यश मिळाले आहे. संयुक्त अरब अमिरातवर 160 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs इराणने डागली होती, ज्यातील 4-5 क्षेपणास्त्रsच जमिनीपर्यंत पोहोचली. अशाचप्रकारे सौदी देखील इराणच्या क्षेपणास्त्रांच्या निशाण्यावर आहे.

सौदी अरेबियाची हवाई सुरक्षा यंत्रणा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी बहुस्तरीय संरक्षण जाळ्याचा वापर करते. सौदी अरेबियाचा संरक्षण अर्थसंकल्प 78 अब्ज डॉलर्सचा असून तो अमेरिकन थाड हवाई सुरक्षा यंत्रणा आणि पॅट्रियट इंटरसेप्टर, दक्षिण कोरियाची केएम-एसएएम हवाई सुरक्षा प्रणाली आणि चिनी अँटी-ड्रोन लेझर तंत्रज्ञानाचा वापर करतो.

Advertisement

संरक्षणाकरता भरभक्कम खर्च

सौदी अरेबियाने 2025 मध्ये स्वत:च्या सैन्यावर 80 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. याचा एक मोठा हिस्सा रॉयल सौदी एअर डिफेन्स फोर्सला अवघड हवाई धोक्यांच्या विरोधात एक मजबूत, बहुस्तरीय ढाल तयार करण्यासाठी देण्यात आला होता. इराण सौदीवर हल्ला करत असताना ही हवाई सुरक्षा प्रणाली सक्रीय झाली आहे.

640 पॅट्रियट पीएसी-3 इंटरसेप्टर

अमेरिकेत निर्मित पॅट्रियल पीएसी-3 एअर डिफेन्स सिस्टीम छोट्या आणि मीडियम रेंजच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. सौदी अरेबियाकडे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आणि तेल सुविधांच्या रक्षणासाठी शेकडो अशाप्रकारचे हिट-टू-किल इंटरसेप्टर आहेत.

थाड यूनिट सक्रीय

मागील वर्षी सौदी अरेबियाने अधिकृतपणे स्वत:चे पहिले टर्मिनल हाय अल्टीट्यूट एरिया डिफेन्स (थाड) युनिट सक्रीय केले होते. ही एक अत्याधुनिक अमेरिकन प्रणाली असून आवश्यक अपर-टियर लेयर प्रदान करते. ही हवाई सुरक्षा प्रणाली पृथ्वीच्या वातावरणाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करते.

3.2 अब्ज डॉलर्सचे केएम-एसएएम ब्लॉक 2

सौदी अरेबियाने केएम-एसएएम ब्लॉक 2 सिस्टीम खरेदी करण्यासाठी दक्षिण कोरियासोबत 3.2 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. चेओंगंग-2 नावाने ओळखली जाणारी ही एक मोबाइल एअर डिफेन्स सिस्टीम आहे. ही लोअर-टियर टॅक्टिकल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs आणि विमानांना इंटरसेप्ट करण्यास सक्षम आहे.

33 एमएम स्काईगार्ड ट्विन कॅनन

सौदी अरेबिया हवाई सुरक्षेसाठी ओर्लिकॉन स्काईगार्ड 35 एमएम ट्विन कॅनन यासारख्या पारंपरिक अँटी-एअरक्राफ्ट आर्टिलरीचा वापर करतो. ही प्रणाली आधुनिक रडारसोबत अॅक्टिव्हली इंटीग्रेटेड असून कमी उंचीवर उडणारे ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांना नष्ट करू शकते.

30 केडब्ल्यू चिनी लेझर शस्त्र

सौदी अरेबिया चीनचा सायलेंट हंटर 30 किलोवॅटच्या फायबर-ऑप्टिक लेझर सिस्टीमचा वापर करते. ही प्रणाली आत्मघाती ड्रोनच्या विरोधात उपयुक्त मानली जाते. परंतु ही लेझर डिफेन्स सिस्टीम सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागांमध्ये उपयुक्त ठरू शकली नाही. वाळवंटातील तीव्र धूळ आणि उष्णतेत लेझरचे ऑप्टिकल ट्रॅकिंग वारंवार निष्प्रभ ठरले होते.

360 डिग्री इलेक्ट्रॉनिक जॅमिंग

वाळवंटी भागात चिनी लेझर एअर डिफेन्सचे अपयश पाहता सौदी अरेबियाने इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर आणि जॅमिंग वाहनांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सौदीने चीनकडून जेएन1101 यासारख्या प्रणाली खरेदी केल्या आहेत. या प्रणाली आकाशात कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन सिग्नल रोखून ड्रोनच्या झुंडला यशस्वीपणे निष्प्रभ ठरवतात.

Advertisement
Tags :

.