For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : 'तरुण भारत'च्या बातमीचा इफेक्ट! साताऱ्यात रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत २४ तासांत कारवाईचे आदेश

05:46 PM Apr 02, 2026 IST | NEETA POTDAR
satara    तरुण भारत च्या बातमीचा इफेक्ट  साताऱ्यात रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत २४ तासांत कारवाईचे आदेश
Advertisement

      साताऱ्यात अतिक्रमणप्रकरणी प्रशासनाची तातडीची हालचाल

Advertisement

सातारा - साताऱ्यात भवानी पेठ परिसरातील सि.स.नं २४० येथे सुरू असलेल्या बांधकामामुळे सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा इफेक्ट दिसून आला असून, सातारा नगरपरिषदेकडून सुरेंद्र बन्सीलाल भट्टड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

भट्टड यांनी बांधकामासाठी लागणारे (विटा, वाळू, लोखंड. ई) यांसारखे साहित्य मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे पादचारी आणि वाहनधारकांना गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदर रस्ता शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Advertisement

ही बाब महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (एम.आर.टी.पी.ऍक्ट) तसेच संबंधित नगरपरिषद कायद्यांचे उल्लंघन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत हा गुन्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत रस्त्यावरील अडथळे व अनधिकृत साहित्य स्वखर्चाने हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निर्धारित मुदतीत रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्यास नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून दंडात्मक स्वरूपात वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणात तरुण भारतने घेतलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. सदर नोटीस नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या सूचनेनुसार नगररचनाकार तुषार मदने यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.