महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बँकिंग आणि वाहन क्षेत्रांच्या पडझडीचा फटका

06:14 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

सेन्सेक्सची 1,235 अंकांची घसरण : गुंतवणूकदारांचे जवळपास 7.25 लाख कोटी बुडाले

Advertisement

मुंबई :

Advertisement

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात बँकिंग, वाहन आणि धातू क्षेत्रात झालेल्या मोठ्या पडझडीमुळे बीएसई सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी कोसळला आहे. यासोबतच निफ्टीही घसरणीसह बंद झाली आहे. या नकारात्मक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 7.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दिग्गज कंपन्यांपैकी यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, बजाज फायनान्स,  आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्यांच्या समभागांमधील जोरदार विक्रीमुळे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रुजू झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतासाठीच्या योजनांवरील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार घाबरले असून विक्रीचा मारा सुरु ठेवला असून याचा बाजाराला मोठा फटका बसला आहे.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1235.08 अंकांनी कोसळून निर्देशांक 1.60 टक्क्यांसह 75,838.36 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी देखील मजबूत पातळीवर उघडला. तथापि, नंतर तो देखील घसरला. दिवसाच्या व्यवहारानंतर तो अखेर, निफ्टी 320 अंकांच्या तीव्र घसरणीसह 23,024.65 वर बंद झाला.

मोठ्या घसरणीची कारणे?

  1. मुख्य कंपन्यांच्या समभागांमधील विक्रीचा बाजाराला फटका

2.आतापर्यंत बहुतेक देशांतर्गत कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत. याचा गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम झाला.

3.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेजारील देशांवर जास्त व्यापार शुल्क लादण्याच्या घोषणेनंतर, बाजारात मोठी अस्थिरता होती.

  1. परदेशी गुंतवणूकदार (एफआयआय) ऑक्टोबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारातून विक्री करत असून याचाही नकारात्मक परिणाम झाला.

गुंतवणूकदारांना 7.25 लाख कोटी

बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 7.25 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सोमवारी बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 7.25 लाख कोटींनी घसरून 4,24,22,866 कोटी रुपयांवर आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia