महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मोती तलावात कोसळलेल्या अल्पवयीन युवतीची ओळख पटली

11:24 AM Nov 22, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

तोल जाऊन पडली की उडी घेतली ? कारण अस्पष्ट

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडीतील मोती तलावात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास एक युवती कोसळली होती . युवतीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आज बुधवारी सकाळी आढळून आला . मृतदेहाची ओळख पटली आहे . सदर युवती अल्पवयीन असून ती सावंतवाडी, न्यू खासकीलवाडा येथे राहते ती मूळ चंदगड येथील आहे. सावंतवाडीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात सदर युवती इयत्ता ११ वी मध्ये शिकत होती. सदर युवतीच्या आईला घटनेची माहिती कळताच धक्का बसला असून त्यामुळे फिट आल्याने त्यांची प्रकृतीही खालावली आहे .युवतीच्या आईला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . सदरची युवती पाण्यात पडली की तिने स्वतःहून उडी घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध सुरु होता . पण आज सकाळी मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला , दरम्यान नगपलिका , सामाजिक बांधिलकीचे सदस्य , नागरिक व पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आज यश आले.पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत .

Advertisement
Tags :
# sawantwadi # moti lake #
Next Article