For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पतीच्या अस्थींना पाठविले अंतराळात

06:37 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
पतीच्या अस्थींना पाठविले अंतराळात
Advertisement

अंतराळात जाण्याचे स्वप्न अनेक लोक पाहतात, परंतु प्रत्येकाला ते पूर्ण करणे शक्य ठरत नाही. अंतराळवीर होण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल असते. अशास्थितीत अंतराळ पर्यटनाचा पर्याय असला तरी तो अत्यंत खर्चिक आहे. परंतु एका महिलेने स्वत:च्या दिवंगत पतीचे अशाप्रकारचे स्वप्न पूर्ण केले आहे. पतीच्या मृत्यूनंतर महिलेने त्याच्या अस्थींना अंतराळात पाठविले.

Advertisement

शॉन हे स्वत:चा मृत्यू झाल्यावर स्वत:च्या अस्थी ताऱ्यांमध्ये विखुरण्यात याव्यात, अशी इच्छा बाळगून होते. फेब्रुवारी महिन्यात 52 वर्षीय शॉन मार्शल यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी एनेट यांनी त्यांची ही अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून देले. अनेक वर्षांपर्यंत पॅनक्रिएटिव्ह संबंधी आजारामुळे शॉन यांची प्रकृती आणि व्यक्तिमत्त्व कमजोर झाले होते.

केंट येथे राहणाऱ्या त्यांच्या पत्नी एनेट (53 वर्षे) या ड्रायव्हिंग इंस्ट्रक्टर आहेत. शॉन यांच्या कल्पनेतील निरोप देण्याचा निश्चय एनेट यांनी केला. शॉन हे रेल्वेचालक राहिले होते, त्यांना प्रवास आणि डान्सिंगचा मोठा छंद होता आणि सर्वाधिक अंतराळावर अनंत प्रेम होते. अंतराळात अस्थी पाठविणे शक्य नसल्याचे प्रथम एनेट यांना वाटले. परंतु गुगलवर सर्च केल्यावर ऑरा फ्लाइट्स नावाची कंपनी लोकांच्या अस्थी अंतराळात विखुरण्याचे काम करत असल्याचे त्यांना कळले.

Advertisement

कंपनी अंतराळात पाठविते अस्थी

या कंपनीची स्थापना इंजिनियर क्रिस रोज आणि एलेक्स बेकर यांनी केली होती. प्रारंभी ते युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डचे विद्यार्थी असताना पॅमेऱ्याला अंतराळात पाठवत होते. पॅमेऱ्याद्वारे टिपलेल्या पृथ्वीच्या अद्भूत छायाचित्रांनी त्यांना आणखी असे प्रकल्प राबविण्याची प्रेरणा मिळाली. अंतराळातून पृथ्वीची निळ्या रंगाची वायुमंडळीय पट्टी, काळ्या रंगाचे आकाश आणि ग्रहाची सुंदर वक्रता हे दृश्य अविश्वसनीय असते असे क्रिस सांगतात. ऑरा फ्लाइट्स दर आठवड्याला 2-3 लोकांच्या अस्थी अंतराळात पाठविते. ते स्ट्रेटोस्फेरिक फुग्यांचा वापर करतात, जे अस्थीयुक्त कॅप्सूलला 1,20,000 फूटांच्या उंचीपर्यंत घेऊन जातात, यादरम्यान कॅमेरा पूर्ण प्रवासाला रिकॉर्ड करतो.

Advertisement
Tags :

.