आरोंद्यातील ते उपोषण आश्वासनानंतर स्थगित
बंद असलेले आरोंदा पोलीस दुरक्षेत्र सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी वेधले लक्ष
न्हावेली / वार्ताहर
आरोंदा ग्रामपंचायत हद्दीत असणारे आरोंदा पंचक्रोशीसाठी आरोंदा पोलीस दुरक्षेत्र आहे परंतु गेली कित्येक वर्ष सदरचे पोलीस दुरक्षेत्र बंद असल्याने,याबाबत ग्रामपंचायत आरोंदा व इतर ग्रामस्थ यांच्याकडून पोलीस दुरुक्षेत्र चालू करण्यासंदर्भात संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. परंतु या कार्यालयाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे एकूण मंजूर पदे आरोंदा पोलीस दुरक्षेत्र येथे (४) व पोलीस चे पोस्ट किरणपाणी येथे ,(४)असे एकूण आठ मंजूर पदे असून ,सद्यस्थितीत पोलीस दुरक्षेत्र व पोलीस चेक पोस्ट येथे फक्त तीन पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. पंचक्रोशीतील वाढणारे ,वाद ,तंटे तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी मंजूर पदाप्रमाणे आरोंदा पोलीस दूरक्षेत्र व पोलीस चेक पोस्ट येथे पोलीस कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी असे या पत्रात नमूद केले होते परंतु सदर करण्यात आलेल्या पाठपुराव्यां बाबत कोणतेही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आरोंदा सरपंच ,उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व आरोंदा गावातील ग्रामस्थ यांनी २६जानेवारी २०२५ रोजी आरोंदा पोलीस दुरक्षेत्र येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते.मात्र सदरील उपोषणाच्या मुद्द्या बाबत सावंतवाडीचे पी आय,श्री अमोल चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, संबंधित मागण्यांबाबत आपण सकारात्मक असून याबत योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन दिल्याने तसेच तसेच सा . बां.विभागाने अधिकृत याबाबत पत्र दिल्याने तूर्तास हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी प्रभारी सरपंच श्री गोविंद उर्फ आबा केरकर ग्रा. प. सदस्य सिद्धेश नाईक, सुभाष नाईक, काका आचरेकर, नरेश देऊलकर,गीतांजली वेळणेकर, शिल्पा नाईक, सुभद्रा नाईक, स्मिताली नाईक, सायली साळगावकर,भदाजी नाईक,सुरेश नाईक, संदेश नाईकतंटामुक्ती अध्यक्ष मनोहर आरोंदेकर. सोसायटी चेअरमन बबन नाईक , ग्रामस्थ - प्रशांत नाईक, अशोक नाईक, सुधाकर नाईक, विद्याधर नाईक, गोपाळ पेडणेकर, बाबी गावडे, संजय रेडकर, राजाराम जाधव, प्रशांत कोरगांवकर, परशुराम नाईक,शंकर नाईक,अंकिता मळेकर, सायली निवजेकर,वनिता निवजेकर, द्रौपदी रेडकर,दिव्या रेडकर, सविता निवजेकर,दिलीप नाईक,हनुमंत नाईक इत्यादी उपस्थित होते.