For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्मार्ट मीटर विरोधातील ते उपोषण अखेर स्थगित

03:18 PM Mar 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
स्मार्ट मीटर विरोधातील ते उपोषण अखेर स्थगित
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सावंतवाडी महावितरण वीज कार्यालयासमोर स्मार्ट मीटर विरोधात उपोषण छेडण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी स्मार्ट मीटर संदर्भात जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत त्यामुळे आपले उपोषण स्थगित करावे असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर श्री मंगेश तळवणेकर यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे . यावेळी शैलेश गवंडळकर , शब्बीर मणियार , मंगेश तळवणेकर , पुंडलिक दळवी , संजय लाड , दीपक पटेकर , ,बाळा बोर्डेकर यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होता .

Advertisement
Advertisement
Tags :

.