For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची घरपट्टी भरणार

12:08 PM Jun 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची घरपट्टी भरणार
Advertisement

तिरोडा सरपंच, उपसरपंचाचा आदर्शवत उपक्रम

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी तिरोडा येथील सरपंच प्रियांका सावंत आणि उपसरपंच संदेश केरकर यांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला. चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची चालू वर्षाची घरपट्टी या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खिशातून भरली आहे.त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले की, शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच पटसंख्या वाढवणे आणि जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. खाजगी शाळांच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक ताण पडतो. अशा परिस्थितीत, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने आपण करत असून आपण या पदावर असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे गावातील गरीब व गरजू कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी नवदाखल विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.सरपंच श्रीमती सावंत व उपसरपंच श्री.केरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल पालकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

Advertisement
Advertisement
Tags :

.