For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेवारस बॅग खरेदी करण्याचा छंद

06:22 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेवारस बॅग खरेदी करण्याचा छंद
Advertisement

आतापर्यंत कोट्यावधीच्या बॅग खरेदी

Advertisement

जगात अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात, काही जणांना वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचा छंद असतो, तर कुणाला स्वयंपाकाची आवड असते. काही जण हिंडणे पसंत करतात, तर कुणाला घरात एकटे राहणे आवडते. परंतु काही जणांचा छंद चर्चेचा विषय ठरत असतो. सोशल मीडियावर सध्या 26 वर्षीय कंटेंट क्रिएटर स्कॉट फेन्सोमेची चर्चा होत आहे. हा युवक बेवारस बॅग खरेदी करण्याचा छंद बाळगून आहे. विमानतळावर दावा न केल्या जाणाऱ्या बॅग्ज हा युवक खरेदी करत असतो.

Advertisement

स्कॉट या बॅग्ज खरेदी करत याच्या आत मिळणाऱ्या गोष्टी लोकांसोबत शेअर करतो. प्रथम तो हा प्रकार छंद म्हणून करत होता, परंतु आता हे त्याचे कायमस्वरुपी काम ठरले आहे. विमानतळावर अनक्लेम बॅग्जना स्कॉट लिलावात खरेदी करतो, त्यानंतर त्याच्या आतमध्ये मिळालेल्या सामग्रीला ऑनलाइन विकतो. यादरम्यान त्याने अनेक अजब सामग्री मिळविली आहे. ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. अलिकडेच त्याने अशा सामग्रीचा एक व्हिडिओ तयार केला होता, ज्याला आतापर्यंत 20 लाख ह्यूज मिळाल्या आहेत.

बॅगेत खजिना

स्कॉटने अलिकडेच एक नाइकीची बॅग खरेदी केली होती, जी त्याने 1200 रुपयांमध्ये मिळविली होती. या बॅगची जिप उघडताच त्यात त्याला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. बॅगेत मोठ्या प्रमाणात सामग्री होती. यात यूज्ड सिगारेट बटपासून नाणी सामील आहेत. स्कॉटला बॅगेच्या एका चेनमधून पेन, दोन सिमकार्ड आणि काही नाणी मिळाली. आतील चेन उघडल्यावर रनअवेचे बूट, हेडफोन, चष्मा, सेफ्टी ग्लोव्हज आणि रेड बुलचा रिकामी कॅनही मिळाला आहे.

अजब सामग्री

याचबरोबर बॅगेत अत्यंत अजब गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. यात एक अवजार होते, तसेच एक डियो होता, याचबरोबर जॅकेट, वृत्तपत्र, हॉटेलचे बिल आणि काही इलेक्ट्रिक केबल्सही बॅगेत होत्या. परंतु बॅग विकून ती खरेदी करण्यासाठी खर्च वसूल करता येईल अशी अपेक्षा स्कॉटला आहे.

Advertisement
Tags :

.