'छावा' ला साज वाईतल्या इतिहासवेड्या तरुणाचा
सातारा :
छावा चित्रपट पडद्यावर 14 फेब्रुवारीला झळकला. तो झळकण्याच्या अगोदरपासून चर्चेत होता. आता तर त्या चित्रपटाबद्दल बरेच कुतूहल निर्माण झाले असून नुकताच सातारचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी चित्रपट गृहात जाऊन छावा पाहिला आहे. असे असताना तो चित्रपट बनवत असताना त्या काळातला पोशाख, त्या काळातली जीवनशैली, त्या काळातील पत्रे याचा अभ्यास करून तसे वास्तव चित्रपटात आणण्यासाठी वाईतल्या इतिहास वेड्या तरुणाने साज चढवला आहे. तर निपाणीच्या तरुणाने आयुध पुरवली आहेत. या दोन्ही तरुणांच्यामुळे छावा हा त्याच काळात घेऊन गेला आहे.
सध्या छावा बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. विकी कौशल्य आणि त्याची ती अप्रतिम भूमिका सगळ्यांना वेड लावत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या लढाया, त्यांनी दिलेली झुंज हे दाखवताना तोच काळ दाखवणे अपेक्षित होते. या चित्रपटाचे कथानक विश्वास पाटील यांच्या छावा या कादंबरीवर असल्याने ते क्रिप्ट घेऊन दिग्दर्शक लोकेशन आणि इतिहास अभ्यासक असलेल्यांचा शोध घेत होते. त्यांची भेट वाई येथील मृण्मय दीपक अरबुणे उर्फ चंद्रहास यांच्याशी झाली. मृण्मय हे इतिहास हा विषय घेऊन पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. 2022 मध्ये त्यांनी छावा या चित्रपटाला सहकार्य करण्याचे ठरले. आणि मृण्मय याने अभ्यास करून सैनिकांचा पोशाख कसा असावा, सैनिक कसे त्या काळात रहात आहेत, लढाई लढतानाचे बारकावे, त्या मोडी लिपीतील पत्रे या सर्व बाबी बाबत त्यांनी सहकार्य केले. तर निपाणीचे व सध्या पुण्यात वास्तव करत असलेले सत्यजित अरुण वैद्य याचा रूद्र आर्ट्स अँड हँडीक्राफ्ट्स या उद्योगातून ऐतिहासिक शस्त्र, गडकोट, पराक्रमी मावळे आणि श्री शिवछत्रपती यांच्या प्रतिकृती साकार करतो. याच त्यांच्या कामामुळे ही मंडळी या चित्रपटाशी जोडली गेली.
ऐतिहासिक चित्रपट म्हणजे केवळ ऐतिहासिक कथानक नव्हे; त्यासाठी ऐतिहासिक वस्तू, वास्तू यांची सांगड घालून चित्रपटाची दृश्ये देखील ऐतिहासिक बनवावी लागतात. चित्रपटाचे कथानक प्रसिद्ध कादंबरी छावा पासून प्रेरित आहे त्यामुळे कथानक तयारच होते. या जोडीने या चित्रपटाचे पोशाख, वेशभूषा, शस्त्र, युद्ध पोशाख, खाद्यपदार्थ, राजचिन्ह, इमारती, मराठा स्थापत्य, चित्र, दाग दागिने अशा सर्व गोष्टींचे ऐतिहासिक संदर्भ तसेच शस्त्रांच्या प्रतिकृती पुरवल्या. ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे पोशाख कसे असावेत, शिरोवस्त्र कसे असावे, साड्या कोणत्या प्रकारच्या असाव्या, युद्ध पोशाख कसे असावेत, युद्धामध्ये कोणती शस्त्रs असावीत आणि त्याचा वापर कोठे करावा, राज्याभिषेक समारंभामध्ये राजचिन्ह कोणती असावी, त्यांची जागा कशी असावी, महाराजांचे सिंहासन कसे असावे, दरबारी बैठक कशी असावी, मुजरा कसा घालावा, जेवणाच्या ताटामध्ये पदार्थ कोणते असावेत अशा अनेक गोष्टींचे ऐतिहासिक पुरावे या जोडीने पुरवले. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांची अस्सल समकालीन पुराव्यादाखल पुरवण्यात आली. यातून हा चित्रपट ऐतिहासिक दृष्ट्या अधिक भक्कम होऊ शकला.
- मृण्मय मूळचे पाटणच्या कुठऱ्याचे
छावाला साज देणारे मृण्मय हे मूळचे पाटण तालुक्यातील कुठरे गावचे.परंतु त्यांचे शिक्षण वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्राr जोशी विद्यालयात झाले असून सध्या ते पुणे विद्यापीठ येथील इतिहास या विषयावर पीएचडी करत आहेत. ते चंद्रहास या नावाने ऐतिहासिक घटना आणि शस्त्र यांवर लघुकाव्य रचतात.
- छावाचे चित्रीकरण वाईतल्या भागात
छावा या चित्रपटात काही सिन दाखवले गेले आहेत ते वाई भागातल्या बावधन, धोम, मेणवली या गावचे लोकेशनवर चित्रीकरण झालेले आहे. चित्रीकरण सुरू असताना स्टार कास्ट मुक्कामी वाई मध्ये होती असे वाई मधील स्थानिक नितीन सावंत यांनी सांगितले.