For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुधाचे वाढीव दर त्वरित मागे घ्यावेत

11:32 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुधाचे वाढीव दर त्वरित मागे घ्यावेत
Advertisement

भाजपची निदर्शने, प्रोत्साहन धनात वाढ करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारने शेतकऱ्यांना द्यावे लागणारे प्रोत्साहन धन त्वरित वितरित करावे. याबरोबरच दुधाच्या प्रोत्साहन धनात 5 ते 10 रुपयांची वाढ करण्यात यावी आणि सध्या पेलेली दूध दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करत भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. दूध दरवाढीच्या निषेधार्थ दुधांचे कॅन घेऊनच आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने नुकतीच इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांना आर्थिक संकटात लोटले आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता महागाईच्या झळांनी होरपळत आहे.

यातच दूध दरात वाढ केल्यामुळे परिणाम सर्वसामान्यांवर परिणाम झाला. यासाठी सरकारने त्वरित दूध दरवाढ मागे घ्यावी. शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहन धन वितरित करावे, अशी मागणी केली. दुधाची दरवाढ केल्यामुळे राज्य सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राज्यभरात आंदोलन केले जात असून याची दखल घेऊन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. भाजप रयत मोर्चा अध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, महानगर रयत मोर्चा अध्यक्ष कल्लाप्पा शहापूरकर, एफ. एस. सिद्दनगौडर, नितीन चौगुले, धनश्री देसाई आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.