पावसाळ्यात महामार्गावर 24 तास दक्ष रहा! सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
खड्डे तातडीने बुजवण्योही आदेश
खेड पतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील पॅकेज 1 ते 10 ाया सध्याया कामाया स्थितीसह पगता सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्ग पाहणी दौऱ्यादरम्यान बुधवारी सायंकाळी पेण येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. महामार्गावर पावसाळ्यात 24 तास दक्ष राहण्यो निर्देश देत महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यो आदेशही अधिकाऱ्यांना दिले.
महामार्गी दयनीय अवस्था झाली असून रखडलेल्या महामार्गाच्या कामांमुळे सर्वा स्तरांतून टीकांचा भडीमार सुरू आहे. महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या घोषणा हवेता विरल्या आहेत. यंदा या गणेशोत्सवातही चाकरमान्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांया दौऱ्यावर आले आहेत. पेण येथे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांसह अन्य खात्यांया अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.
या बैठकीदरम्यान मंत्री चव्हाण यांनी पावसाळ्यात महामार्गावर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपाययोजना करण्याया साना अधिकाऱ्यांना केल्या. पावसाळ्यात अधिकाऱ्यांया पथकांनी 24 तास सतर्प रहायला हवे. मुसळधार पावसामुळे महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते खड्डे तातडीने बुजवून वाहनचालकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांयासह राष्ट्रीय महामार्ग पाधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागो अधिकारी उपस्थित होते.