शिक्षण खात्यासाठी सर्वाधिक 47,224 कोटींची तरतूद
विद्यार्थी विकासाला अधिक प्राधान्य : विद्याविकास योजनेंतर्गत पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यापुस्तके
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात विद्यार्थी विकासाला अधिक प्राधान्य दिले आहेत. त्यानुसार शिक्षण खात्यासाठी सर्वाधिक 47,224 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्याविकास योजनेंतर्गत पदवीपूर्व विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यापुस्तके दिली जातील. मुलांवर वाढत्या मोबाईल फोन वापराचे दुष्परिणाम रोखण्यासाठी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
‘चांगले शिक्षण, उज्ज्वल भविष्य’ या घोषणेसह एकाच छताखाली दर्जेदार शिक्षण देण्यासाठी 500 एडीबी शाळा, केकेआरडी निधीतून 200 शाळा आणि केएमईआरसी निधीतून 100 शाळा असे एकूण 800 शाळा कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये श्रेणीसुधारित केल्या जातील. यासाठी येत्या काळात एकूण 3,900 कोटी ऊपये खर्च केले जातील, असे त्यांनी सांगितले.
सरकारी प्राथमिक, माध्यमिक आणि पदवीपूर्व कॉलेजमध्ये नवीन खोल्या बांधण्यासाठी आणि खोल्यांच्या दुऊस्तीसाठी 565 कोटी ऊपये, बांधकामासाठी 75 कोटी ऊपये आणि शाळांमध्ये फर्निचर खरेदीसाठी 25 कोटी ऊपये दिले जातील. तसेच सरकारी शाळा आणि पदवीपूर्व कॉलेजांच्या देखभालीसाठी 125 ऊपयांचे अनुदान देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे.
सरकारी प्राथमिक शाळांमध्ये द्विभाषिक वर्ग राबविण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची क्षमता वाढविण्यासाठी 24 कोटी ऊपये खर्चातून भाषा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. आयआयटी धारवाडच्या सहकार्याने आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या सुमारे 12.28 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अवलंब करून वैयक्तिक स्वयं-शिक्षण डिजिटल ट्यूटर सुविधा प्रदान केली जाईल. याचा अंदाजे खर्च 5 कोटी ऊपये असेल. 2026-27 या वर्षात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 15,000 रिक्त शिक्षक पदे भरली जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात दिले. विजापूर येथील सैनिक शाळेच्या वसतिगृह इमारतींच्या टप्प्याटप्प्याने पुनर्बांधणीसाठी चालू वर्षात 10 कोटी ऊपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
►कर्नाटक पब्लिक स्कूलसाठी 3,900 कोटींची तरतूद
►नवीन खोल्या आणि दुरुस्तीसाठी 565 कोटी रु.
►शिक्षकांसाठी द्विभाषिक प्रशिक्षणास 24 कोटी रु.
► 12.28 लाख विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वयं-शिक्षण डिजिटल ट्यूटर सुविधा प्रदान
►15 हजार रिक्त शिक्षक पदे भरण्याचे आश्वासन