For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात उंचीवरील चित्रपटगृह

01:24 PM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वात उंचीवरील चित्रपटगृह
Advertisement

भारतात चित्रपटांची जादू खूप अगोदरपासून दिसून येते. लडाखच्या लेहमधील एक चित्रपट भारत तसेच जगातील सर्वात उंचीवरील स्थायी चित्रपटगृह आहे. समुद्रसपाटीपासून 11,500 फुटांच्या उंचीवर निर्मित हे चित्रपटगृह चित्रपटप्रेमींसाठी अनोखा अनुभव प्रदान करते. येथे चित्रपट पाहताना नायक-नायिकांचा आवाज सामान्य चित्रपटगृहांपेक्षा अत्यंत वेगळा ऐकू येतो. यामागील कारण विज्ञानात दडलेले आहे. अत्याधुनिक उंचीवरील हवेचे पातळ आवरण याचे कारण आहे. समुद्रसपाटीवर हवेचे घनत्व अधिक असते, ती ध्वनिच्या तरंगांना प्रभावीपणे नेऊ शकते. परंतु 11,500 फूटांवर हवेचे घनत्व सुमारे 30-35 टक्के कमी होते. यामुळे ध्वनितरंगांचा प्रसार बदलतो.

Advertisement

यामुळे ध्वनिची तीव्रता प्रभावित होते. आवाज काहीसा कमजोर आणि फ्लॅट ऐकू येतो. याचमुळे या चित्रपटगृहात स्पेशल ऑडिओ सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे, तरीही नैसर्गिक स्वरुपात आवाजातील फरक जाणवतो. वैज्ञानिकांनुसार अत्याधिक उंचीवर तापमान कमी असणे आणि हवेचे घनत्व कमी असल्याने ध्वनीचा वेग आणि गुणवत्ता दोन्हींवर प्रभाव पडतो. लडाखमध्ये पोहोचणाऱ्या पर्यटकांसाठी हे चित्रपटगृह अत्यंत खास आहे तसेच तो लाइफटाइम अनुभव देणारा आहे. हिमाच्छादित शिखरांदरम्यान पॉपकॉर्न खात चित्रपट पाहण्याचा येथील अनुभव अनोखा आहे. परंतु यात आव्हाने देखील आहेत, चित्रपटगृहात ऑक्सिजनची कमतरता जाणवते. काही प्रेक्षकांना श्वसनात त्रास किंवा डोकेदुखी होऊ शकते. येथे बाहेरील तापमान उणेपर्यंत पोहोचू शकते, अशास्थितीत उपकरणांची देखभाल मोठे आव्हान आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.