For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गौंडवाडमधील शिवपुतळ्यानजीकचे हायमास्ट बंद अवस्थेत

09:25 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
गौंडवाडमधील शिवपुतळ्यानजीकचे हायमास्ट बंद अवस्थेत
Advertisement

कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Advertisement

कंग्राळी बुद्रुक : गौंडवाड गावच्या प्रवशेद्वारावर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीवर प्रकाशझोत पडण्यासाठी बसविण्यात आलेल्या हायमास्ट विद्युत दिव्यामधील काही दिवे गेल्या कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत असल्यामुळे शिवरायांच्या मूर्तीवर अंधार पडत आहे. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. सदस्यांना या भागाच्या लोकप्रतिनिधींना याबद्दल कळवूनसुद्धा अजून दिवे न बसविल्यामुळे शिवप्रेमी व ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गौंडवाड गावच्या वेशीतील प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती ग्रामस्थांच्यावतीने बसविण्यात आली आहे. यामुळे गावच्या वैभवामध्ये एक वेगळीच भर पडली. यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार व पालकमंत्री सतेश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून गेल्या सहा वर्षापूर्वी या प्रवेशद्वाराच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर प्रकाशझोत पडण्यासाठी शासकीय निधीतून हायमास्ट विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. परंतु आता बऱ्याच दिवसांपासून त्यातील काही दिवे बंद असल्यामुळे सदर चौकामध्ये अंधार पसरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा अंधारामध्येच राहत आहे. याबद्दल गौंडवाडमधील शिवप्र्रेमी युवक मंडळे व ग्रामस्थांच्या वतीने कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीला हायमास्ट दिवे बसविण्यासाठी विनंती अर्ज करूनसुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे. तेव्हा ग्रा. पं. सदस्य व अधिकारी तसेच या भागाचे लोकप्रतिनिधी याकडे त्वरित लक्ष देऊन हायमास्ट दिवे सुरू करून असंख्य शिवप्रेमी युवक मंडळे व ग्रामस्थ यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.