For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्थायी समितीच्या ‘त्या’ ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती

06:47 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्थायी समितीच्या ‘त्या’ ठरावाला  उच्च न्यायालयाची स्थगिती
Advertisement

भूभाडे वसुलीचा ठेका रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती : ठेकेदाराला दिलासा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महानगरपालिकेच्या अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत भूभाडे वसुलीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र संबंधित ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेऊन रद्द करण्याच्या निर्णयालाच स्थगिती घेतली आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये झालेल्या त्या निर्णयाला लगाम लागला आहे.

Advertisement

दरम्यान महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या त्या निर्णयाला स्थगिती देताना प्रलंबित असलेले 71 लाखांचे भूभाडे दोन टप्प्यात भरण्याची मुभादेखील न्यायालयाने ठेकेदार शिवानंद होरट्टी यांना दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे यापुढेही भूभाडे वसुली होरट्टी यांच्याकडेच राहणार आहे. होरट्टी यांच्याकडे बिल थकले होते. त्यामुळे महापालिकेने नोटीस बजावली होती. याचबरोबर अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित ठेकेदाराला काळ्यायादीत घालण्याबाबतही जोरदार चर्चा झाली होती.

भूभाडे वसुली मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन ठेकेदाराला काम देण्याबाबत ठरविण्यात आले होते. मात्र होरट्टी यांनी न्यायालयातूनच महापालिकेच्या त्या ठरावाला दणका दिला आहे. यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना चांगलीच चपराक बसली आहे.

Advertisement
Tags :

.