महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माउंट एव्हरेस्टच्या उंचीचा विक्रम मोडीत निघणार

06:21 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माउंट एव्हरेस्ट हे पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर आहे. परंतु माउंट एव्हरेस्ट कायम सर्वात उंच शिखर राहणार का असा प्रश्न उभा ठाकला आहे. जेव्हा दोन टेक्टोनिक प्लेट्स परस्परांना धडकतात, तेव्हा एक दुसऱ्याच्या खाली जाते, मग त्याचा वरचा हिस्सा म्हणजेच क्रस्ट उंची प्राप्त करत असतो. पर्वत निर्माण होण्यामागे हीच प्रक्रिया असते. परंतु यात आणखी अनेक घटक देखील कारणीभूत ठरत असतात. धडकेची तीव्रता, क्रस्टचे तापमान, आकार हे घटक महत्त्वाचे ठरतात.

Advertisement

एव्हरेस्टची उंची दरवर्षी वाढत आहे. हे प्रमाण सुमारे एक इंच इतके आहे. याचे कारण त्याच्या आसपास सातत्याने होत असलेले  इरोजन असल्याचे अबरदीन युनिव्हर्सिटीचे जियोलॉजिस्ट रॉब बटलर यांनी सांगितले आहे. अलिकडेच एक अध्ययन करण्यात आले होते, ज्यात एव्हरेस्टपासून 72 किलोमीटर अंतरावर एका नदीचे जाळे आहे, ज्यामुळे 89 हजार वर्षात एव्हरेस्ट 49 ते 164 फूट वर आला असल्याचे यात म्हटले गेले आहे.

Advertisement

इरोजनमुळे एव्हरेस्टच नव्हे तर अनेक पर्वतांची उंची वाढू शकते. अनेकदा घटू देखील शकते. इरोजन आणि अपलिफ्टच्या दरात अंतरावर हे निर्भर असते. अपलिफ्ट दर अधिक असल्यास पर्वत वरच्या दिशेने उचलतो. इरोजन अधिक असेल तर पर्वत खाली खचतो असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे जियोलॉजिस्ट मॅथ्यू फॉक्स यांनी सांगितले आहे.

जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वात उंच आणि एव्हरेस्टचा शेजारी नंगा पर्वत अत्यंत वेगाने वर सरकत आहे. एक दिवस हा नंगा पर्वत एव्हरेस्टपेक्षा अधिक उंच ठरणार आहे. याच्या मागे आसपासचे इरोजनच कारणीभूत आहे. एव्हरेस्टची उंची वाढण्याचा प्रमाण नंगा पर्वतापेक्षा कमी आहे. एव्हरेस्ट शिखर हे नंगा पर्वत 2000 फूटांनी उंच आहे.

पुढील 1 कोटी वर्षापर्यंत हिमालयातील सर्व शिखर अधिक उंच होणार आहेत, कारण याच्या खालील टेक्टोनिक प्लेट्स सातत्याने परस्परांना ढकलत आहेत. हिमालयाखाली क्रस्ट थंड आहे म्हणजेच हा अजून वरच्या दिशेने येणार आहे. तसेच तेथे मान्सूनमुळे इरोजन देखील होत असते.

एखाद्या जेलसारख्या पदार्थाला हातात ठेवून जोरात दाबल्यास तो बोटांमधून बाहेर पडते, त्याचप्रकारे पर्वतांसोबत घडते. पर्वत हे आसपासच्या इरोजनमुळे वरच्या दिशेने सरकत आहेत. एखादे शिखर एव्हरेस्टला मागे टाकू शकते. ही बाब काही मीटर किंवा शेकडो मीटरची आहे. एव्हरेस्टपेक्षा एखादे शिखर 1 किलोमीटर अधिक उंच ठरल्यास स्थिती अवघड अन् भयावह राहणार असल्याचे बटलर यांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article