For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुताटकीयुक्त बेटाची होणार विक्री

06:16 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भुताटकीयुक्त बेटाची होणार विक्री
Advertisement

सैनिकांचे आत्मे भटकत असल्याची वदंता

Advertisement

जर तुम्ही श्रीमंत असाल आणि पर्यटनाच्या उद्योगाद्वारे कमाई करू इच्छित असाल तर हे वृत्त तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. युरोपमध्ये एक बेट असून तेथे पर्यटनाच्या अमाप संधी आहेत, हे बेट आता विकले जाणार आहे. या बेटाचा वापर शतकांपर्यंत सैन्याकडून केला जात होता. या बेटाचा स्वत:चा खासगी किनारा आहे. तसेच या बेटावर एक हॉटेल सुरू करण्याची अनुमती देखील आहे. येथे केवळ संबंधिताला गुंतवणूक करावी लागणार आहे.

डेवनच्या किनाऱ्यापासून दूर हे 6 एकरचे डेक बेट प्लायमाउथपासून नजीक आहे. या बेटावर 18 व्या शतकातील तोफांचा सेट, खासगी समुद्र किनारा, तटबंदी, बरॅक आणि लक्झरी हॉटेलसाठी प्लॅनिंगची अनुमती आहे. परंतु या बेटावर 15 माजी सैनिकांच्या आत्म्यांचा वास असल्याची अफवा आहे, हे सैनिक एकेकाळी येथील बरॅकमध्ये राहत होते.

Advertisement

जर तुम्ही येथील प्रसारमाध्यमांवर विश्वास ठेवत असाल तर ते सर्व ब्रिटिश सैनिक होते, त्यांचे आत्मे आमच्या रक्षणासाठी येथे आहोत. जेव्हा ते जिवंत होते, तेव्हा त्यांनी हेच केले आणि आताही ते हेच करत आहेत. बेटावर अशा अनेक गोष्टी पाहिल्या आहेत, ज्याबद्दल समजून घेता येत नाही असे बेटाचे वर्तमान मालक मॉर्गन फिलिप्स यांनी म्हटले आहे.

या कहाण्या खऱ्या असोत किंवा नसो, पर्यटकांना आकर्षित करण्याचे कारण ठरू शकतात, कारण जगात अनेक ठिकाणे केवळ भुताटकीमुळे पर्यटनस्थळांमध्ये रुपांतरित झाली आहेत असे मॉर्गन यांचे म्हणणे आहे. 2016 मध्ये 64 कोटी 59 लाख रुपयांमध्ये बेट खरेदी केल्यावर मॉर्गन यांना 43 बेड्स असणारे हॉटेल निर्माण करण्याची अनुमती मिळाली. मॉगंन हे सध्या बेटावर समुहांना निर्देशित पर्यटन प्रदान करतात. एखादा संभाव्य खरेदीदार यावर पर्यटनाला चालना देण्यास मदत करू शकतो असे त्यांचे मानणे आहे. या बेटावरील नुतनीकरणासाठी सुमारे 2 अब्ज 68 कोटी 88 लाख रुपये खर्च येणार असल्याचा अनुमान आहे.

Advertisement
Tags :

.