महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्चना घारेंनी बांधली मनोज जरागेंना राखी

02:08 PM Sep 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मराठा समाजासाठी झुंज देणाऱ्या भावाचे हात केले बळकट 

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी जिवाची तमा न बाळगता समाजाला आपले कुटुंब मानून लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते . मालवण राजकोट येथील दुर्देवी घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी त्यांची भेट घेत रक्षाबंधन केले.

आदरणीय मनोजदादा जरांगे मराठा समाजासाठी लढत आहेत. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झगडत आहेत. समाजासाठी झुंज देणाऱ्या भावाचे हात बळकट करण्यासाठी दादांना रक्षाबंधन केले. लाडक्या भावाला राखी बांधून मनोज दादांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या लढ्याला यश येवो अशी प्रार्थना महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या चरणी अर्चना घारे-परब यांनी केली‌.

Advertisement
Tags :
#tarun bharat news # tarun bharat official # manoj jarange patil # archana ghare parab # konkan news #
Next Article