Ajara accident | यात्रा करून घराकडे निघाल्या होत्या पाहुण्या; एसटीची वाट पाहत थांबलेल्या 'त्या' चौघांवर काळाचा अचानक घाला!
हाळोली फाट्यावर पर्यटकांच्या कारची धडक;
संकेश्वर-बांदा महामार्गावर हाळोली फाटयानजीक सरीता हॉटेल समोर पर्यटकांच्या कारने धडक दिल्याने संजय काळू कांबळे (वय ४५), उषा संजय कांबळे (वय ४०), श्रुतिका संजय कांबळे (वय १४, सर्व रा. सोहाळे) व मालुबाई अशोक कांबळे (वय वर्षे ३५, रा. महागोंड, ता. आजरा) हे गंभीर जखमी झाले. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. याबाबतची फिर्याद संजय काळू कांबळे रा. सोहाळे) यांनी आजरा पोलीसात दिली आहे.
रविवारी हाळोली गावची यात्राहोती. यात्रेसाठी पाहुण्यांकडे आले होते. यात्राकरुन आपल्या गावी जाण्यासाठी हाळोली फाट्यावर बसची वाट पाहत सोमवारी सकाळी थांबले होते. यावेळी आंबोलीकडून - हैद्राबादकडे जाण्प्रया पर्यटकांच्या कारने ही धडक दिली. अपघातातील सर्व जखमींवर आजरा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी कारचालक भरतराज सुब्रमण्यम याला ताब्यात घेण्यात आले आहे.