शॉपिंग मॉल क्षेत्राच्या वाढीला मिळणार चालना
शॉपिंग मॉल क्षेत्राच्या वाढीला मिळणार चालना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी तीन ते चार वर्षांत देशातील शॉपिंग मॉलचे क्षेत्र 35 टक्क्यांनी वाढू शकते. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिल रेटिंगने ही माहिती दिली. एजन्सीने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात किरकोळ विक्रीत जोरदार सुधारणा झाल्याने मॉल क्षेत्रातील वाढीला चालना मिळाली असल्याची माहिती आहे.
किरकोळ क्षेत्र 3 ते 35 दशलक्ष चौरस फुटांनी वाढण्याची शक्यता आहे, जे विद्यमान क्षेत्राच्या एक तृतीयांश आहे. विविध भौगोलिक क्षेत्रांतील मागणीच्या लवचिकतेमुळे किरकोळ वसुली कायम राहण्याची अपेक्षा आहे. अहवालात असे म्हटले आहे की मॉल्स आणि नवीन मालमत्तेमध्ये गुंतवणूकदारांची आवड कायम राहिल्याने क्षेत्राची वाढ होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
क्रिसिल रेटिंग्सचे संचालक आनंद कुलकर्णी यांनी अहवालात सांगितले की, मॉलमध्ये पुढील तीन ते चार वर्षांत 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले, ‘एवढ्या मोठ्या वाढीची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे जागतिक महामारीच्या काळात ठप्प झालेल्या नवीन पुरवठ्याचे काम पुन्हा सुरू करणे. दुसरे म्हणजे, मॉल्समध्ये मजबूत किरकोळ विक्री आणि नंतर मॉल मालकांची मजबूत ऑपरेटिंग कामगिरी होय.