Kolhapur : भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत; कोल्हापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण
भटक्या कुत्र्यांचा कहर कोल्हापूरात!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या ९ महिन्यांत तब्बल ३४९६ नागरिकांना कुत्र्यांनी लचके तोडले असून, ही आकडेवारी केवळ चिंताजनक नाही, तर नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारी आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला संस्थात्मक क्षेत्रांमधून भटकी कुत्री हटवण्याचे निर्देश दिल्याने, स्थानिक प्रशासनावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे.
कोल्हापूरात रात्री उशिरा घरी परतणारे कामगार, फिरायला बाहेर पडलेले नागरिक, पादचारी आणि वाहनचालक हे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य ठरत आहेत. अनेकदा अचानक अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांमुळे रस्त्यांवर अपघातही घडत आहेत. दिवसाढवळ्याही रस्त्यावरून चालणे मुश्कील झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.