महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रीकच्या टेंटोग्लोयुचा लेव्हीसशी बरोबरी

06:04 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/सेंटडेनीस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूषांच्या लांब उडी प्रकारात ग्रीकच्या मिटाडीस टेंटोग्लोयुने 8.48 मीटरची उडी घेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच त्याने अमेरिकेच्या कार्ललेव्हीसच्या विक्रमाशी बरोबरी केली. लेव्हीस प्रमाणेच टेंटोग्लोयुने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये लांबउडी प्रकारात सुवर्णपदके मिळविण्याचा विक्रम केला आहे.

Advertisement

तीन वर्षांपूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत टेंटोग्लोयुने पुरूषांच्या लांब उडी प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. तसेच त्याने विश्वअॅथलेटिक स्पर्धेत गेल्या वर्षी विजेतेपद पटकाविले होते. ग्रीसचे पंतप्रधान मिटसोटाकीस यांनी टेंटोग्लोयो खास अभिनंदन केले आहे. अमेरिकेच्या लेबीसने ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग चारवेळा लांबउडी प्रकारात सुवर्ण पदके मिळविण्याचा पराक्रम केला आहे. 1984 ते 1996 दरम्यान झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये लेव्हीसने सलग चारवेळा विजेतीपदे मिळविली होती. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूषांच्या लांबउडी प्रकारात जमैकाच्या पिनॉकने रौप्य पदक तर इटलीच्या फर्लेनीने कास्य पदक मिळविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article