'द ग्रेट इंडियन कपिल शो' सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिजच्या यादीत
'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा सर्वात लोकप्रिय भारतीय वेब सिरीजच्या यादीत गेला आहे. IMDb ने नुकतीच २०२४ ची सर्वात लोकप्रिय वेबसिरीजची यादी जाहीर केली. तर या यादीत 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाने १० स्थान पटकावले आहे.
२०२४ च्या अखेरी IMDb च्या वापरकर्त्यांमध्ये यावर्षात सर्वात लोकप्रिय ठरलेल्या १० भारतीय वेबसिरीज ची घोषणा केली. या यादीत संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी- द डायमंड बाजार' या वेबसिरीजने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या पहिल्या नॉन फिक्शन कार्यक्रमाने या यादीत स्थान मिळवले आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शो पैकी एक असलेला हा शो जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
'मी अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरलेलो आहे, की 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा IMDb च्या यादीत सर्वोत्कृष्ट १० मध्ये पोहोचला आहे. आमच्या अद्भूत टीमचे, आमच्या शानदार पाहुण्याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांमुळे हे शक्य झाले आहे. ज्यांनी आम्हाला वर्षानुवर्षे भरभरून प्रेम दिले, या सर्वांचा मी आभारी आहे. या टॉप १० च्या यादी हा एकमेव नॉन फिक्शन शो आहे ज्याने हे स्थान पटकाविले आहे. हे स्थान अधिक खास बनत हास्याची ती शक्ती अधोरेखीत करत लोकांना एकत्र आणते. हा प्रवास अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार!', अशी प्रतिक्रिया कपिल शर्मा यांनी दिली.
या यादीमध्ये 'हिरामंडीः द डायमंड बाजार', 'मिर्झापूर', 'पंचायत', 'ग्यारह ग्यारह', 'सिटाडेल हानी बनी', 'मामला लिगल है', 'ताजाखबर', 'मर्डर इन माहीम', 'शेखर होम', 'द ग्रेट इंडियन' कपिल शो या सिरीजचा अनुक्रमाने समावेश आहे.