For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur unseasonal rain | हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला! कोल्हापुरात कलिंगड पिकासह पालेभाज्यांचे अतोनात नुकसान

05:26 PM Apr 02, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur unseasonal rain   हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला  कोल्हापुरात कलिंगड पिकासह पालेभाज्यांचे अतोनात नुकसान
Advertisement

                कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस

Advertisement

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी आणि आज पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय..विजांच्या कडकडाटासह गारांच्या पावसाचा पालेभाज्या आणि फळभाज्या शेतीला मोठा फटका बसलायं..वडणगे इथल्या शिवाजी पवार या शेतकऱ्यांच सुमारे एक एकर क्षेत्रातील कलिंगड पीक चिखलात रुतून नुकसान झालंय..

एप्रिल आणि मे महिन्यात कलिंगड पिकाला मोठी मागणी असते. त्यामुळे शिवाजी पोवार यांनी आधुनिक शेती करत आपल्या एक एकर शेतीत कलिंगड पिकाची लागवड केली होती..त्यासाठी त्यांनी सुमारे 70 ते 80 हजार खर्च केला होता..शिवाय पुढील आठवड्यात या कलिंगड पिकांची काढणी होणार होती..

Advertisement

मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासचं हिसकावून घेतलायं..त्यामुळे सरकारने नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..दरम्यान शिवाजी पवार यांच्या बरोबर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच नुकसान झालं असून अनेक भागात घरांचीही पडझड झाली आहे..तसचं मका पिकही जमीनदोस्त झालयं.. त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांना काय मदत करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे..

Advertisement
Tags :

.