'प्राजक्ता कोळी'च्या लग्नाची धुमधाम
प्राजक्ताने मेंहंदी सोहळ्यातील अगदी स्वप्नवत फोटोज केले शेअर
मुंबई
युट्युबर इन्फ्लुएन्सर आणि प्राजक्त कोळी आणि वृशांक खनल या दोघांचे मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटोजना चाहत्यांनी अगदी डोक्यावर घेतले आहे. एखाद्या सिनेमाच्या फ्रेमसारखे वाटतील असे स्वप्नवत फोटोज् प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
युट्युबर प्राजक्ता कोळी ही तिच्या अनेक वर्षांचा बॉयफ्रेण्ड वृशांक खनल याच्याही लग्नगाठ बांधणार आहे. वृशांक हा पेश्याने वकील आहे. प्राजक्ता आणि वृशांक हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. त्यांच्या मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले.
साधारणे १० ते १२ वर्षांच्या या नात्याला आता लग्नाचे रुप येणार आहे. या दोघांचे लग्न २३ ते २५ या कालावधीत होणार असून कर्जतला ग्रॅण्ड असे डेस्टीनेशन वेडींग होणार आहे.
प्राजक्ताचा लग्नाचा पेहराव हा डीझायर अनिता डोंगरे हिने डिझाईन केला. याशिवाय प्राजक्ता तिच्या आईच्या लग्नातील साडी आणि दागिने तिच्या लग्नाच्या एखाद्या कार्यक्रमात परिधान करणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्त आणि वृशांकच्या लग्ना बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थिती लावणार असल्याचेही समजत आहे. यामध्ये वरून धवन, विद्या बालन, बादशाह, रफ्तार अशा सेलिब्रेंटीच्या नावांचा समावेश आहे.