For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा हद्दीतील कचरा ग्राम पंचायतीने हटविला

10:42 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
मनपा हद्दीतील कचरा ग्राम पंचायतीने हटविला
Advertisement

कंग्राळी खुर्द ग्रा. पं.चे स्तुत्य कार्य : गाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन : रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक 

कंग्राळी खुर्द गावच्या ज्योतीनगर क्रॉसजवळील बेळगाव महापालिका हद्दीतील महानगरपालिकेकडून उचल न झालेला कचरा कंग्राळी खुर्द ग्रा. पं.ने उचलून परिसर स्वच्छ केला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करणारे ज्योतीनगर परिसरातील अनेक नागरिक महानगरपालिकेची कचरागाडी येत असतानादेखील कचरा गाडीमध्ये न टाकता ज्योतीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला टाकत असतात. कचरा न टाकण्यासंदर्भात अनेकवेळा त्यांना समजावून सांगूनदेखील काही फरक पडलेला नाही. तसेच त्यांच्यात थोडीसुद्धा स्वच्छतेविषयी जाणीव दिसून येत नाही. यामुळे या क्रॉसवर मोठ्याप्रमाणात कचरा साठला होता.परिणामी सदर परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे परिसरातील नागरिकांबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत होते.

Advertisement

अन् ग्रा.पं. सदस्य सरसावले 

बेळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचरा महानगरपालिकेने उचल करण्याचे ठरविलेले असते. परंतु या भागातील नगरसेवकांनीसुद्धा येथील कचरा उचल समस्येकडे दुर्लक्ष केल्याने कंग्राळी खुर्द ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर, महेश धामणेकर आदींनी जातीने लक्ष घालून ग्रा. पं. कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचऱ्याची उचल करून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच यापुढे नागरिकांनी कचरा गाडीत कचरा टाकावा. जर कचरा गाडीत न टाकता या ठिकाणच्या रस्त्यालगत कचरा टाकताना सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.