For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हडप केलेल्या जागा सरकारजमा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

10:28 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
हडप केलेल्या जागा सरकारजमा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
Advertisement

मुख्यमंत्र्यांपर्यंत कागदपत्रांसह लेखी पाठपुरावा करण्यात येईल : यशवंत बिर्जे यांची ग्वाही

Advertisement

खानापूर : शहरातील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याबाबत मुख्यमंत्री तसेच केंद्रीय पातळीपर्यंत कागदपत्रांसह लेखी पाठपुरावा करण्यात येईल आणि शहरातील सर्व शासकीय जागा सरकारी म्हणून सामान्य जनतेला वापरण्यास मिळतील, याच उद्देशाने माझे प्रयत्न राहतील, असे यशवंत बिर्जे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. येथील सर्व्हे नंबर 49 या जागेतील सरकारी जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार यशवंत बिर्जे यांनी केली होती. याबाबत खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या आदेशानुसार या जागेचा नुकताच सर्व्हे करण्यात आला आहे. 49 या जागेत 36 गुंठ्यात सरकारी तळ्dयाची नोंद काही वर्षांपूर्वीच्या सरकारी दप्तरात नोंद होती. मात्र अलीकडे या तळ्याची पोटखराब अशी फेरनोंदणी करून या जागेवरून तळ्dयाचा उल्लेख काढण्यात आलेला आहे. असा अहवाल करण्यात आलेला असून 16 गुंठे जागा मोकळी असून 16 गुंठ्या जागेत इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. असा अहवाल सर्व्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे तहसीलदारांना सादर केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार

Advertisement

याबाबत तक्रारदार यशवंत बिर्जे हे ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, शहरातील काही सरकारी जागा शासकीय यंत्रणेला हाताशी धरून हडप केल्याचे आमच्या कागदोपत्री निदर्शनास आल्याने मी आणि अॅड. अरुण सरदेसाई यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार नोंदवली आहे. तसेच याबाबत न्यायालयातही दाद मागितलेली आहे. तसेच आणखीन काही जागेत शासकीय यंत्रणेला धरून (मौखिक) तोंडी आदेशाद्वारे जागा हडप करण्यात आलेल्या आहेत. या जागेबाबतही जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. तसेच सर्व्हे नंबर 49 ही जागा सरकारी होती. या जागेवर कब्जेदार म्हणून रघुनाथ भट जोशी यांचे नाव दाखल होते. कब्जेदार असलेल्या रघुनाथ भट जोशी यांनी ही सरकारी जागा विनायक वर्दे यांना विकली, अशी नेंद आहे. या जागेत पोटखराब अ आणि पोटखराब ब अशी स्पष्ट नेंद होती. ब पोटखराब ही 36 गुंठे जागा होती.

तलावाच्या जागेत प्लॉट

या जागेत गेल्या शंभर वर्षापूर्वीपासून तळे होते. या तळ्याचा वापर शहरातील अनेक नागरिक करत होते. मात्र काही वर्षापूर्वी हे तळे जाणीपूर्वक बुजवून या ठिकाणी प्लॉट पाडवून विक्री करण्यात आली आहे. ब पोटखराब ही जागा केंव्हाही वापरता येत नाही. असे असताना 36 गुंठे ब पोटखराब जागा हडप करण्यात आली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत असून ही जागा पुन्हा सरकारजमा होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले ंजातील, जर सरकारी यंत्रणेकडून न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे यशवंत बिर्जे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :

.