सरकार एथर एनर्जीमध्ये 200 कोटींची गुंतवणूक करणार
ही गुंतवणूक भारत आणि जपान यांच्या फंडामार्फत होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत सरकार इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जीच्या 1,200 कोटी रुपयांच्या निधी उभारणीमध्ये 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक भारत-जपान फंडामार्फत केली जाईल. त्याचबरोबर, हिरो मोटोकॉर्प देखील गुंतवणूक करणार आहे. ही निधी उभारणी कंपनीच्या 2,500 कोटी रुपये उभारण्याच्या मोठ्या योजनेचा पहिला टप्पा आहे. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक एथर एनर्जीला भारत सरकारकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. कंपनीच्या प्रस्तावित 1,200 कोटी रुपयांच्या निधी उभारणीमध्ये सरकार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने 15 जुलै रोजी बीएसईमध्ये दाखल केलेल्या शेअर बाजारातील फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. ही गुंतवणूक भारत-जपान फंड मार्फत केली जाईल. हा 600 दशलक्ष डॉलर्सचा द्विपक्षीय निधी आहे, जो भारत सरकार आणि जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. या निधीचे व्यवस्थापन नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेडद्वारे केले जाते.
एथरचे दोन्ही सह-संस्थापकही गुंतवणूक करणार
एथर एनर्जीचे सह-संस्थापक तरुण मेहता आणि स्वप्निल बबनलाल जैन हे देखील या निधी उभारणी प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. दोघेही कंपनीत प्रत्येकी 20 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. यासाठी दोघेही 1,58,730 कन्व्हर्टिबल वॉरंट्स खरेदी करतील.