For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलांना साक्षर, सुरक्षितता, स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न

06:48 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिलांना साक्षर  सुरक्षितता  स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार : मठग्राम महिला मोर्चातून भाजपचे शक्तिप्रदर्शन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

मडगाव : राज्यातील महिलांना साक्षर करतानाच, त्यांना सुरक्षितता निर्माण करणे व त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आपले सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती काल शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावात बोलताना दिली. मठग्राम भाजप महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या मेळाव्यातून भाजपने पुन्हा एकदा मडगावात शक्तिप्रदर्शन घडवून आणले.

Advertisement

यावेळी व्यासपीठावर प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष अभिषेक काकोडकर, नेहा योगिराज कामत, दीपा शिरोडकर,  तनूजा पैंगीणकर, माजी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, माजी नगरसेवक महेश आमोणकर, दामोदर वरक, दिपाली सावळ, लता पेडणेकर, सुनीता पराडकर तसेच भाजप कायदा सल्लागार अॅड. सुलेखा शेट्यो व राज्य महिला अध्यक्ष कवळेकर इत्यादींची उपस्थिती होती.

या मेळाव्यात डॉ. अमला कामत, श्रीमती आवदा व्हियेगस, रजनी रेडकर

व सरोजा नाईक या महिलांचा त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गोव्यात महिलांना शंभर टक्के साक्षर करण्याचे काम आपल्या सरकारच्या कारर्किदीत पूर्ण झाले व भारत सरकारकडून गोवा 100 टक्के साक्षर असल्याचे प्रमाण पत्र मिळाले. महिला भगिनीची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची आहे. त्यासाठी पर्यटक पोलिस, डायरेक्ट पोलिस व पिंक पोर्स अशी यंत्रणा उभी केलेली आहे. जर महिलांनी 100 क्रमांकावर फोन डायल केला तर कमीत कमी 9 मिनिटांत पोलिस तुमच्या घरी येऊन दाखल होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बऱ्याच वेळा महिला तणावाखाली येऊन आत्महत्या करण्याचा मार्ग शोधतात अशा महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील डॉ. पोकळे या 24 तास उपलब्ध असतात. आतापर्यंत 34 हजार कॉल्स आलेले आहेत. त्यातील 70 टक्के कॉल्स हे मानसिक दबावाखाली आलेल्या महिलांचे होते. कोणत्याही मानसिक ताणावर त्या मार्गदर्शनासाठी मोफत उपलब्ध असतात असे.

महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. स्वंयपूर्ण मित्रांद्वारे या योजना जनतेपर्यंत पोचवल्या जात आहे. अधिकाधिक महिलांनी या स्वयंपूर्ण मित्राकडे संपर्क साधून योजनाची माहिती जाणून घ्यावी व या योजनाचा लाभ घ्यावा. सुमारे 150 जास्त योजना उपलब्ध आहेत. मात्र, जास्तीत जास्त लोकांचा कल हा गृह आधार, लाडली लक्ष्मी व दयानंद सामाजिक सुरक्षा योजना यांच्याचकडे असतो. इतर योजनांकडे कुणी लक्ष देत नाही.

महिला लखपती व्हाव्यात

अटल आसरा, प्रधानमंत्री आयुष्यमान, दीनदयाळ स्वास्थ सेवा योजना, सीएम स्कॉलरशीप अशा कितीतरी योजना कार्यान्वित आहेत. मात्र, महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी असलेल्या योजनाच जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा अशा महिलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार तयार आहे. गोव्यात महिला लखपती व्हाव्यात, अशी सरकारची अपेक्षा आहे व महिलांनी त्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महिलांच्या पाठिंब्यानेच भाजप मोठा झाला

महिलाशक्ती ही खऱ्या अर्थांने भाजपची ताकद आहे. भाजपचे संघटन असो किंवा निवडणुका असू देत, महिलावर्गांने नेहमीच भाजपसाठी योगदान दिल्यानेच भाजप आज मोठा झालेला आहे, असे उद्गार प्रदेध्याक्ष दामू नाईक यांनी काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांसाठी ‘हर घर शौचालय’, हर घर जल मिशन, जन धन योजना, उज्वला योजना इत्यादी महत्वपूर्ण योजना राबवल्या. अशा योजना यापूर्वी राबवण्यात आल्या नव्हत्या. गोव्यात गृह आधार तसेच हल्लीच चेक्ड बाय डॉक्टर अशी योजना राबविण्यात आली व त्यांचा सुमारे 47 हजार महिलांनी लाभ घेतला. त्यात सुमारे सात हजार महिलांमध्ये गंभीर आजाराची लक्षणे आढळून आली व त्यांना त्वरित पुढील वैद्यकीय उपचारांचा मार्ग मोकळा करून दिला.

नारीशक्ती, युवा शक्तीवर भर

नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर नारी शक्ती व युवा शक्तीवर भर दिला. आज देशात महिलांची संख्या 50 टक्के आहे व प्रत्येक निर्णयात महिलांना स्थान मिळायला पाहिजे म्हणूनच महिला आरक्षण विधेयक आणले. परंतु, विरोधकांनी त्याला विरोध केला. मात्र, मोदीजी आरक्षणाचे विधेयक संमत करणार असल्याचा विश्वास मंत्री दिगंबर कामत यांनी केला.

गोव्यातील ज्या तरूणींना विमान पायलट होण्याची इच्छा आहे. त्यासाठी ‘उडाण भरारी’ ही योजना सुरू करण्यात आली असून ही योजना लवकरच मार्गी लागणार असल्याचे श्री. कामत म्हणाले. आमदार उल्हास तुयेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना असा भव्य महिला मेळावा आयोजित केल्याने आयोजकांचे कौतुक केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन डॉ. रूपा च्यारी यांनी केले, तर शेवटी नेहा कामत यांनी आभार मानले. सुरुवातीला तुनजा पैंगीणकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी नेहा कामत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Advertisement
Tags :

.